शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

राष्ट्रपती निवडणूक : कोविंद यांचे पारडे जड, मतांचे गणित ‘रालोआ’ उमेदवाराच्या बाजूने

By admin | Updated: June 26, 2017 01:12 IST

राष्ट्रपतीपदाचे रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद ६२ टक्क्यांहून अधिक मतांसह सहजपणे निवडून येऊ शकतात.

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाचे रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद ६२ टक्क्यांहून अधिक मतांसह सहजपणे निवडून येऊ शकतात. तथापि, त्यांच्या मतांची टक्केवारी विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना २०१२ मध्ये मिळालेल्या ६९ टक्के मतांहून कमी असेल.राष्ट्रपतीपदासाठी पहिल्यांदाच दलित विरुद्ध दलित अशी लढाई होत आहे. आकडे भाजपच्या बाजूने असून, त्यांच्या उमेदवाराला जवळपास सात लाख मते मिळू शकतात. ही संख्या १० लाख ९८ हजार ९०३ मतांच्या सुमारे दोन तृतीयांश आहे. काही अपक्ष, आम आदमी पार्टी, लोकदल, एमआयएमआयएमसारख्या पक्षांनी अद्याप पत्ते उघड केले नाहीत. त्यांच्याकडे जवळपास ३९ हजार ९६५ मते आहेत. हा गट कोणाकडे जाईल हे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी उमेदवाराच्या प्रचार मोहिमेवर अवलंबून राहील. कोविंद यांना एकूण ७७६ खासदारांपैकी ५२४ खासदारांचा पाठिंबा असून, यातील ३३७ खासदार भाजपचे आहेत. विरोधी पक्षाच्या उमेदवार मीरा कुमार यांना २३५ खासदारांचा पाठिंबा आहे. रालोआ उमेदवाराला खासदारांच्या मताच्या रुपाने ३ लाख ७० हजार ९९२ मते मिळतील. तर उर्वरित ३ लाख ११ हजार ६८५ मते त्यांना आमदारांची मिळतील. मीरा कुमार यांना खासदारांच्या रुपाने १ लाख ६६ हजार ३८० मते मिळतील. २ लाख ९ हजार ८८१ मते राज्यांतील आमदारांकडून मिळतील. उत्तर प्रदेशातून प्रचाराची सुुरुवात रामनाथ कोविंद यांनी रविवारी उत्तरप्रदेशात लखनौमधून आपल्या प्रचाराची आणि देशव्यापी दौऱ्याची सुरुवात केली. राज्यातील भाजप खासदार आणि आमदारांची त्यांनी भेट घेतली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे महासचिव भूपेंद्र यादव यांच्यासोबत कोविंद हे विमानतळावरुन थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले. कालीदास मार्ग येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोविंद यांनी केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासह, नितीन गडकरी, उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्याशी चर्चा केली. विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.विवेकाने मतदान करा - मीरा कुमार राष्ट्रपतीपदाच्या विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी रविवारी या निवडणुकीत मतदार असलेल्या सर्व आमदार खासदारांना आपल्या सद्सद््विवेकबुद्धीला स्मरून मतदान करावे, असे आवाहन केले. संसदेच्या आणि राज्य विधिमंडळांच्या सदस्यांनी उद्देशून लिहिलेल्या पत्रात मीरा कुमार म्हणतात: एक इतिहास घडविणाची तुम्हाला संधी आहे. या पवित्र कामासाठी आपण मनाने व कृतीने एकजूट दाखवू या. प्रत्येकाने आपल्या मनाच्या आतील आवाजाला साद देऊन देशाला दिशा दाखविण्याची हिच वेळ आहे. त्या शेवटच्या दिवशी म्हणजे बुधवार, दि.२८ जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.मीरा कुमार यांच्या ‘योग्यते’वर स्वराज यांचा ‘व्हिडीओ हल्ला’मीरा कुमार याआधी लोकसभेच्या अध्यक्ष असताना त्यांनी विरोधी पक्षांना कशी वागणूक दिली हे दाखवून एकप्रकारे त्यांच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी परराराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी रविवारी चार वर्षांपूर्वीच्या आपल्या एका भाषणाचे व्हिडिओ चित्रिकरण प्रसिद्ध केले. सन २०१३ मध्ये आपण लोकसभेत केलेल्या सहा मिनिटांच्या भाषणात त्यावेळच्या अध्यक्षा मीरा कुमार यांनी कसे ६० वेळा अडथळे आणले हे दाखविणारा व्हिडिओ यू ट्यूबवर टाकून ‘लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांनी विरोधी पक्षनेत्यास कशी वागणूक दिली ते पाहा’ असे भाष्यही केले.