शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतिपदाची निवडणूक जाहीर, १८ जुलै रोजी मतदान, या महिन्यात भाजप करणार उमेदवार घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 08:43 IST

Presidential election : जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात नसल्याने हा केंद्रशासित प्रदेश निवडणुकीत प्रक्रियेत नाही. राज्यसभेतही जम्मू-काश्मीरचे प्रतिनिधी नाहीत. 

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या घोषित केलेल्या निवडणूक वेळापत्रकासोबत नवीन राष्ट्रपतींची निवड करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली. राष्ट्रपतिपदासाठी १८ जुलै रोजी निवडणूक होणार असून, मतमोजणी २१ जुलै रोजी होईल. निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार चार राज्यांतील राज्यसभेच्या १६ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक आणि लोकसभेच्या दोन जागांसोबत काही राज्यांतील विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात नसल्याने हा केंद्रशासित प्रदेश निवडणुकीत प्रक्रियेत नाही. राज्यसभेतही जम्मू-काश्मीरचे प्रतिनिधी नाहीत. 

यांना करता नाही येणार मतदानराज्यसभेच्या १२ नामनिर्देशित सदस्य आणि लोकसभा किंवा विधानसभा सदस्यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाही. विशेष म्हणजे, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साह यांनी राज्यसभेचा राजीनामा दिलेला नसल्याने ते मतदान करतील. 

काँग्रेसमध्ये  हालचाली नाहीत राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक घोषित झाली असताना सत्तारुढ किंवा काँग्रेसमध्ये उमेदवाराची निवड करण्याच्या दृष्टीने कोणत्याही हालचाली दिसत नाही. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनीही एकजुटीअभावी कोणताही पुढाकार घेतलेला नाही. विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे पुढाकार घेण्याची शक्यता आहे. 

भाजपच्या जोरदार हालचालीभाजपने रालोआतील घटक पक्षांशी समन्वय करण्यास शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांना नियुक्त केले. त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. राष्ट्रपतिपदाचा उमेदवार भाजप जूनच्या तिसऱ्या आठवड्यात ठरवील.

(विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुदत २४ जुलै रोजी संपत आहे.)

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्ष