शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'आप'ला दिलासा : ११ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारी याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 16:40 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आम आदमी पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आम आदमी पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. लाभाच्या पदासंबंधी मंत्री कैलाश गहलोत यांच्यासह ११ आमदारांना अपात्र घोषित करण्याची मागणी करणारी याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली.केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या सल्ल्याच्या आधारे राष्ट्रपतींनी हा निर्णय घेतला. निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असतांना याचिका फेटाळण्यात आल्याने आप कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये उत्साह संचारल्याची माहिती पक्ष नेत्यांकडून देण्यात आली आहे. २८ ऑॅक्टोबरला राष्ट्रपतींनी या आमदारांना दिलासा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. काय आहे प्रकरण ?याचिकाकर्ते विवेग गर्ग यांनी मार्च २०१७ मध्ये राष्ट्रपती यांच्या समक्ष ही याचिका दाखल केली. परिवहन मंत्री कैलाश गहलोत यांच्यासह ११ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी त्यांनी केली होती.आमदार असतानाही सर्वांची नियुक्ती ११ जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सह अध्यक्ष पदी करण्यात आली होती. लाभाचे पद असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे मागणी त्यामुळे करण्यात आली होती. राष्ट्रपतींकडून ही याचिका केंद्रीय निवडणूक  आयोगाकडे पाठवण्यात आली होती. या आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही. कारण , प्राधिकरणाच्या सह अध्यक्ष पदावर कार्यरत असताना त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे भत्ते, वेतन अथवा मानधन स्वीकारण्यात आलेले नाहीत, असे मत आॅगस्ट महिन्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने व्यक्त केले होते. त्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोगाने याचिका फेटाळण्याचा सल्ला राष्ट्रपतींना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आमदारांना दिलासा मिळाला आहे. संजीव झा (बुराडी), नितीन त्यागी (लक्ष्मीनगर), प्रवीण कुमार    (जंगपूरा), पवन कुमार शर्मा (आदर्श नगर), राजेश गुप्ता (वझीरपूर), दत्त शर्मा (घोंडा), सरिता सिंह    (रोहताश नगर), दिनेश मोहनिया    (संगम विहार), अमानतुल्लाह खान (ओखला), कैलाश गहलोत    (नजफगढ), जरनैल सिंह (तिलक नगर).

टॅग्स :AAPआपMLAआमदारdelhiदिल्लीPresidentराष्ट्राध्यक्षArvind Kejriwalअरविंद केजरीवाल