शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष करणाऱ्यांनी महात्मा गांधींचा अहिंसेचा मंत्र लक्षात ठेवावा- राष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 21:49 IST

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना उद्देशून राष्ट्रपतींचं भाषण

नवी दिल्ली: कोणत्याही कारणासाठी संघर्ष करणाऱ्यांनी महात्मा गांधींनी दिलेला अहिंसेचा मंत्र लक्षात ठेवायला हवा, अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांना संबोधित केलं. सध्या देशात अनेक ठिकाणी सुधारित नागरिकत्व कायद्यात आंदोलनं सुरू आहेत. काही भागांत आंदोलनांना हिंसक वळणदेखील लागलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींचं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. महात्मा गांधींचे विचार राष्ट्र निर्माणासाठी आजही सुसंगत आहेत. सत्य आणि अहिंसा या त्यांच्या तत्त्वांची आज जास्त आवश्यकता आहे. कोणत्याही उद्देशानं संघर्ष करणाऱ्यांनी, विशेषत: तरुणांनी गांधीजींचा अहिंसेचा विचार सदैव लक्षात ठेवायला हवा. गांधींजींनी दिलेला हा विचार संपूर्ण मानवतेसाठी खूप मोठी देणगी आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपतींनी केलं. गेल्या काही दिवसांमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, जामिया मिलिया विद्यापीठात विद्यार्थ्यांची आंदोलनं सुरू आहेत. या विद्यापीठांमध्ये हिंसाचाराच्या घटनादेखील घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी हे आवाहन केल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रपतींनी त्यांच्या संदेशातून सत्ताधारी आणि विरोधकांना एकत्र येण्याचं आवाहनही केलं. 'लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधकांची भूमिका महत्त्वाची असते. त्यांनी त्यांची राजकीय भूमिका पार पाडताना देशाचा विकास आणि देशवासीयांच्या कल्याणासाठी सोबत काम करायला हवं. विकासाच्या मार्गानं वाटचाल करताना आपला देश, देशाचे नागरिक, जगाला सहाय्य करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहोत. मानवतेच्या भविष्याच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू,' असं राष्ट्रपतींनी म्हटलं.  

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदRepublic Dayप्रजासत्ताक दिनMahatma Gandhiमहात्मा गांधी