शाह अब्दुल्ला यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपतींना शोक
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
नवी दिल्ली-सौदी अरेबियाचे शाह अब्दुल्ला यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी यावेळी शाह यांच्या मनात भारताप्रती स्नेह व जिव्हाळा असल्याचे म्हटले.
शाह अब्दुल्ला यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपतींना शोक
नवी दिल्ली-सौदी अरेबियाचे शाह अब्दुल्ला यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी यावेळी शाह यांच्या मनात भारताप्रती स्नेह व जिव्हाळा असल्याचे म्हटले. सोशल नेटवर्किंग साईट टिष्ट्वटरवर नोंदविलेल्या संदेशात मुखर्जी यांनी, भारत व येथील नागरिकांप्रती त्यांच्या मनात खरा स्नेह व जिव्हाळा होता. ते व्यक्तिगत पातळीवर भारतासोबत संबंध सुधारण्याकरिता कटिबद्ध होते. त्यांच्या निधनामुळे सौदी अरेबियाने एक लोकप्रिय नेता, भारताने एक जवळचा मित्र व जगाने एक ज्येष्ठ राजकीय नेता गमावला आहे असे म्हटले आहे.शाह अब्दुल्ला यांच्या निधनाचे वृत्त सौदी सरकारी टीव्हीने गेल्या रात्री १ वाजता दिले होते. ते ९० वर्षांचे होते. पंतप्रधान मोदी यांना दु:खनवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे शाह अब्दुल्ला यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले असून शाह यांनी आपल्या देशावर अमिट छाप उमटविली असल्याचे म्हटले आहे. टिष्ट्वटरवर त्यांनी लिहिले की , शाह यांच्या निधनामुळे आपण एका अशा व्यक्तीला मुकलो आहोत ज्याने आपल्या देशावर अमिट छाप उमटविली होती. या दु:खद प्रसंगी आमच्या संवेदना सौदी अरेबियातील नागरिकांच्या सोबत आहेत.