नवी दिल्ली - मतदार यादी तयार करणे, हे जगातील सर्वांत कठीण आणि पारदर्शक कामांपैकी एक आहे, जी निवडणूक प्रक्रियेची अचूकता आणि पावित्र्य मजबूत करते, अशी टिप्पणी मतदार यादीतील अनियमिततेच्या आरोपांदरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांनी केली आहे. स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय निवडणूक मालमत्तेवरील परिषदेत मंगळवारी ते बोलत होते.
मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, मतदार यादी दरवर्षी कायद्यानुसार त्यातील बदलांदरम्यान आणि निवडणुकीपूर्वी मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्य पक्षांबरोबर शेअर केली जाते. १९६०पासून ही यादी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसोबत शेअर केली जात आहे. ज्यामध्ये दावे, हरकती आणि अपिलांची तरतूद आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी आयोगावर मतदारांच्या डेटामध्ये फेरफार केल्याचा आरोप केल्यानंतर त्यांचे हे वक्तव्य आले.