शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

‘शुक्र मिशन’ची तयारी सुरू

By admin | Updated: April 25, 2017 00:52 IST

आपल्या ग्रहमालेतील ‘शुक्र’ या ग्रहाची रहस्ये उलगडण्यासाठी भारताने तेथे यान पाठविण्याची योजना अद्याप प्राथमिक

थिरुवनंतपूरम : आपल्या ग्रहमालेतील ‘शुक्र’ या ग्रहाची रहस्ये उलगडण्यासाठी भारताने तेथे यान पाठविण्याची योजना अद्याप प्राथमिक स्तरावर असली तरी भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) याची जय्यत तयारी सुरु केली असून ‘व्हिनस मिशन’मध्ये कोणते वैज्ञानिक प्रयोग करावेत याविषयीचे प्रस्ताव पाठविण्याचे देशभरातील वैज्ञानिकांना आवाहन केले आहे.‘इस्रो’ने त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध केलेल्या माहितीनुसार ‘शुक्र’ ग्रहाच्या दिशेने पाठवायच्या उपग्रहाचे वजन अंदाजे १७५ किग्रॅ एवढे असण्याची अपेक्षा असून त्यावर ५०० वॉट वीज उपलब्ध असेल. हा उपग्रह ५०० बाय ६० हजार किमी अंतराच्या लंबवर्तुळाकार कक्षेतून ‘शुक्रा’भोवती घिरट्या घालेल. काही महिन्यांनी ही कक्षा कमी होईल.हे यान ‘शुक्रा’भोवती प्रदक्षिणा करीत असताना कोणते प्रयोग केले जाऊ शकतील याची संकल्पना वैज्ञानिकांना तयार करता यावी यासाठी ‘इस्रो’ने ही प्राथमिक माहिती प्रसृत केली आहे. शुक्र ग्रहाच्या वातावरमाणाचा व पृष्ठभागाचा अभ्यास, सूर्य व शुक्राचे परस्पर संबंध, प्राणीशास्त्रीय प्रयोग आणि नव्या तंत्रज्ञानाची तपासणी व सिद्धता यावर या मिशनमध्ये भर असेल व त्यादृष्टीने वैज्ञानिकांनी करायचे वैज्ञानिक प्रयोग सुचवावेत, अशी अपेक्षा आहे.‘इस्रो’च्या अधिकाऱ्याने सांगितले की, या मिशनला सरकारकडून मंजुरी मिळाली असून संसदेने संमत केलेल्या लेखानुदानातही याचा उल्लेख आहे. मात्र या मिशनचा नक्की कार्यक्रम अद्याप ठरलेला नाही. ‘इस्रो’ म्हणते की, आकार, वस्तुमान, घनता व गुरुत्वाकर्षण इत्यादींच्या बाबतीत बरेच साम्य असल्याने शुक्र हे पृथ्वीची जुळे भावंड मानले जाते. सुमारे ४.५ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वी व शुक्र या दोन्ही ग्रहांची निर्मिती एकाच वेळी झाली असावे, असे वैज्ञानिकांना वाटते. (वृत्तसंस्था)