शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘डिस्टन्सिंग’चे नियम पाळून पावसाळी अधिवेशन घेण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 06:41 IST

लोकसभा व राज्यसभेच्या बैठका स्वतंत्रपणे घेण्याचा प्रस्ताव

नवी दिल्ली : संसदेचे आगामी पावसाळी अधिवेशन भरविताना ‘सोशल डिन्स्टन्सिंग’चे पालन करता यावे यासाठी लोकसभाराज्यसभा या दोन्ही सभागृहांच्या बैठका एकाच वेळी न घेता स्वतंत्रपणे घेण्याचा नवा पर्याय पुढे आला आहे. यासाठीची तयारी पूर्ण करून अशा प्रकारे संसदेचे अधिवेशन आॅगस्टअखेर किंवा सप्टेंबरमध्ये घेणे शक्य होईल, असे सूत्रांनी सांगितले.

याच नव्या प्रस्तावाचा विचार करण्यासाठी राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू व लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची सोमवारी बैठक झाली. नंतर दोघांनी दोन्ही सभागृहांची दालने व गॅलऱ्यांची पाहणी करून ‘सोश्ल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे पालन करून तेथे सदस्यांची आसनव्यवस्था कशी करता येईल, याचा आढावा घेतला. दोन्ही सभागृहांच्या बैठका नेहमीप्रमाणे एकाच वेळी त्यांच्या ठरलेल्या दालनात घ्यायच्या म्हटले तर तेथे सर्व सदस्यांची ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळून आसनव्यवस्था होणे शक्य नाही.

अधिवेशन सुरू असताना दोन्ही सभागहांच्या बैठका एकाच वेळी घेणे नियमांनुसार बंधनकारक नाही. त्यामुळे दोन्ही सभागृहांच्या बैठका निरनिराळ्या वेळेला आयोजित केल्या तर ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळूनही तसे करणे शक्य होईल. त्यानुसार लोकसभेची बैठक सुरू असताना तेथील सदस्यांची आसनव्यवस्था लोकसभाराज्यसभा या दोन्हींच्या दालतान व गॅलऱ्यांमध्ये करायची व राज्यसभेची बैठकही अशाच प्रकारे स्वतंत्रपणे घ्यायची, असा हा प्रस्ताव आहे.

बरीच तयारी करावी लागेल

अशा प्रकारे अधिवेशन भरविण्यासाठी बरीच तयारी करावी लागेल. त्यात जे सदस्य गॅलºयांमध्ये व दुसºया सभागृहाच्या दालनात बसतील त्यांना तेथून कामकाज दिसण्याची व त्यात सहभागी होण्याची आॅडिओ-व्हिडिओ व्यवस्था करणे, सुरू असलेल्या भाषणांच्या लगेचच्या लगेच दुभाष्यांमार्फत भाषांतराची सोय करणे, दोन-तीन ठिकाणी मिळून होणाºया बैठकीतील कामकाजाचे एकसंध थेट प्रक्षेपण करणे व मतदान घेण्याची वेळ आल्यास सदस्यांना ते जेथे बसले असतील तेथूनच मतदान करता येईल, अशी व्यवस्था करणे इत्यादींचा समावेश असेल.

राज्यसभा सचिवालयाने आधी फक्त आपल्या सभागृहाची अशा प्रकारे बैठक घेण्याचा विचार केला होता. त्यात बैठकीच्या वेळी सदस्यांना राज्यसभेच्या नेहमीच्या दालनाखेरीज सेंट्रल हॉल व बालयोगी सभागृहात विखरून बसविण्याची योजना होती.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाlok sabhaलोकसभाcorona virusकोरोना वायरस बातम्या