शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनालढ्यासाठी सज्ज राहा, केंद्राचे सतर्कतेचे आदेश; परदेशातून आलेले १५ जण पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 05:54 IST

देशात म्यानमार आणि थायलंडमधून आलेले तब्बल १५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह निघाले. 

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : चीनसह अनेक देशांमध्ये कोरोना अनियंत्रित झाल्यानंतर भारतातही तो परदेशी प्रवाशांच्या मार्गाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. देशात सोमवारी म्यानमार आणि थायलंडमधून आलेले तब्बल १५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह निघाले. 

दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी १०० डॉक्टर आणि भारतीय वैद्यकीय संघटनेच्या (आयएमए) सदस्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे संवाद साधल्यानंतर मंगळवारी देशभरातील सर्व कोविड रग्णालयांत ‘मॉक ड्रिल’ करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

बिहारच्या गया विमानतळावर थायलंडमधील ९, म्यानमारमधील एक आणि इंग्लंडमधील एका प्रवाशाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला आहे. त्याचवेळी दिल्ली विमानतळावर म्यानमारमधील ४ परदेशी नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सर्व नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. गया येथे तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले ११ परदेशी नागरिक कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांना हॉटेलमध्येच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

बूस्टर डोस घेण्याचे आवाहन

कोविडची सद्यस्थिती, लसीकरण कार्यक्रम व सरकारी प्रयत्नांबाबत नागरिकांना जागरूक करून कोरोनाची भीती कमी करण्यावर डॉ. मांडविया यांनी भर दिला. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोविडच्या पंचसूत्रीचा अवलंब करण्याचा व बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले.

श्वसनाचे रुग्ण वाढल्यास सतर्क राहा

काही भागांत कोविडशी संबंधित रुग्णालयात भरती किंवा श्वसनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली, तर सतर्क राहा, रुग्णालयांनी त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे, असा अलर्ट राज्यांना देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

देशात ३४२८ सक्रिय रुग्ण

देशात मागील २४ तासांत १९६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ३४२८ वर पोहोचली आहे. केरळमधील २ मृत्यूंसह मृतांची एकूण संख्या ५,३०,६९५ आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार