शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा बृजमंडल यात्रा काढण्यात येणार, नूह हिंसाचारानंतर हिंदू महापंचायतीत निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 18:13 IST

गेल्या महिन्यात ३१ जुलै रोजी बृजमंडल यात्रेदरम्यान नूहमध्ये प्रचंड हिंसाचार झाला होता.

हरयाणातील नूह येथे पुन्हा बृजमंडल यात्रा काढण्यात येणार आहे. पलवलमध्ये झालेल्या हिंदू महापंचायतीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या महिन्यात २८ ऑगस्टला पुन्हा बृजमंडल यात्रा काढण्यात येणार असल्याचे महापंचायतीत सांगण्यात आले. मात्र, या यात्रेची तारीख मागे किंवा पुढे होऊ शकते. दरम्यान, गेल्या महिन्यात ३१ जुलै रोजी बृजमंडल यात्रेदरम्यान नूहमध्ये प्रचंड हिंसाचार झाला होता. दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर तीन डझनहून अधिक वाहने जाळण्यात आली. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता.

सर्व हिंदू संघटनांनी २८ ऑगस्ट रोजी यात्रा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यात्रा शांततेत आणि उत्साहात पार पडेल अशी अपेक्षा आहे, असे विश्व हिंदू परिषद विभागाचे मंत्री देवेंद्र सिंह यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले. दरम्यान, आज पलवलमध्ये हिंदू महापंचायत झाली. या हिंदू महापंचायतीला विश्व हिंदू परिषदेच्या बृजमंडल जलाभिषेक यात्रेच्या पूर्वतयारीबाबत चर्चा करण्यास पोलिसांनी परवानगी दिली होती. पलवलचे एसपी लोकेंद्र सिंह यांनी सांगितले की, अनेक अटींवर परवानगी देण्यात आली आहे. द्वेषयुक्त भाषण प्रतिबंधित आहे. आमची टीम प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवेल आणि लोकांवर कोणतीही चुकीची कारवाई केली जाईल.

हिंदू महापंचायतीत केलेल्या मागण्याहिंसाचाराचा तपास एनआयएकडून करण्यात यावा. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांना एक कोटी रुपये आणि सरकारी नोकरी द्यावी. जखमींच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत देण्यात यावी. दंगलीत ज्यांचे नुकसान झाले, त्यांचे सर्वेक्षण करून त्यांना भरपाई मिळावी. बेकायदेशीर घुसखोरांना राज्यातून हाकलून द्यावे, बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बाहेर पाठवले पाहिजे. नुह जिल्ह्यातील किंवा आसपासच्या गावातील लोकांना शस्त्र परवाना देण्यात यावा. परिसरात निमलष्करी दल तैनात करावे, मेवातमध्ये मुख्यालय करावे, दंगली घडवणाऱ्यांची ओळख पटवावी आणि त्यांचे घर जप्त करावे, अशा मागण्या हिंदू महापंचायतीत करण्यात आल्या.

ही 'करा किंवा मरा' अशी स्थिती- आचार्य आझाद शास्त्रीमहापंचायतीत हरयाणा गौ रक्षक दलाचे आचार्य आझाद शास्त्री यांनी ही 'करा किंवा मरा' अशी स्थिती असल्याचे म्हटले आणि तरुणांना शस्त्रे उचलण्यास सांगितले. शास्त्री म्हणाले की, आपण मेवातमध्ये १०० शस्त्रांचा परवाना ताबडतोब घेतला पाहिजे. बंदुकांचा नव्हे तर रायफल्सचा. कारण रायफल लांब अंतरापर्यंत गोळीबार करू शकतात. ही 'करा किंवा मरा' अशी परिस्थिती आहे. हिंदू आणि मुस्लिमांच्या आधारावर या देशाची फाळणी झाली. तसेच तरुणांनी एफआयआरला घाबरू नका असे सांगितले. एफआयआरला घाबरण्याची गरज नाही. माझ्यावरही एफआयआर आहेत, पण आपण घाबरू नये, असे शास्त्री यांनी सांगितले.

टॅग्स :Haryanaहरयाणा