शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

बापरे! घरात सुरू होती तेराव्याची तयारी अन् अचानक एक दिवस आधी परतला मृत्यू झालेला तरुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 21:05 IST

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या तरुणाने घर सोडले. त्याचा मृत्यू झाल्याची बातमी त्याच्या कुटुंबीयांनीही नातेवाईक आणि समाजामध्ये पसरवली.

अभिनेता शाहिद कपूरचा 'चुप चुप के' हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल. या चित्रपटात, कर्जबाजारी झालेला जीतू (शाहिद कपूर) आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे वडिलांना विम्याच्या पैशाने सर्व कर्ज फेडता यावेत असा जीतूचा उद्देश असतो. हा विचार करून तो नदीत उडी घेतो. बराच शोध घेऊनही त्याचा मृतदेह सापडत नाही. अशी चित्रपटातील कथा आहे. मात्र आता खऱ्या आयुष्यातही अशीच एक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये हा प्रकार पाहायला मिळाला आहे. 

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या तरुणाने घर सोडले. त्याचा मृत्यू झाल्याची बातमी त्याच्या कुटुंबीयांनीही नातेवाईक आणि समाजामध्ये पसरवली. मात्र, तेराव्याच्या एक दिवस आधी तो जिवंत परतला तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. बिजनौरमधील हलदौर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जगनवाला गावात ही घटना घडली आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तरुणावर गावकऱ्यांचे सुमारे तीन लाख रुपयांचे कर्ज होते. 

कमल सिंह यांनी सांगितले की, सहा सप्टेंबर रोजी तरुणाच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. विशिष्ट प्रकारचा किटक चावल्याने या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याचा मृतदेह गंगेत सोडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी मृत घोषित करण्यात आलेल्या तरुणाच्या तेराव्याचे विधी होणार होते. घरी त्याची तयारी देखील सुरू करण्यात आली. 

मृत घोषित केलेला तरुण बुधवारी रात्री तेराव्याच्या एक दिवस आधी गावात परतल्यावर या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले. गुरुवारी सकाळी या तरुणाला जिवंत पाहून ग्रामस्थ हादरले. याबाबत तरुण व त्याच्या कुटुंबीयांशी तरुण कामानिमित्त बाहेर गेला होता असे सांगितले. आता पोलीस या तरुणाच्या मृत्यू हे ढोंग होते का, याची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.