शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या संसद भवनाचे उद्घाटन भव्य दिव्य करण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 05:52 IST

मोदी सरकारच्या सर्व मंत्र्यांसह देशातील अनेक मान्यवर, अनेक देशांचे राजदूत, उच्चायुक्त, चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन होणार आहे. हा सोहळा ऐतिहासिक करण्याची तयारी जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. 

मोदी सरकारच्या सर्व मंत्र्यांसह देशातील अनेक मान्यवर, अनेक देशांचे राजदूत, उच्चायुक्त, चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. २८ मे रोजी मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण होत आहेत. तत्पूर्वी दोन दिवस आधी संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. 

यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संपूर्ण मंत्रिमंडळ, सर्व खासदार, सर्व माजी लोकसभा अध्यक्ष यांना निमंत्रण देण्यात आले आहे. संपूर्ण संसद भवन फुलांनी आणि रोषणाईने सजवण्यात येत आहे. जुने संसद भवन देखील सजवण्यात येत आहे. 

मोदींचे काम काँग्रेसला पाहवले जात नाही  काँग्रेस नेते राहुल गांधी आणि जयराम रमेश यांनी नवीन संसद भवनावर केलेल्या वक्तव्यावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोणतेही काम या लोकांना पाहवले जात नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिन असल्याने ही अभिमानाची बाब आहे. पंतप्रधान मोदी देशातील १४० कोटी लोकांचे प्रतिनिधी आहेत. देशातील जनतेने त्यांना निवडून दिले आहे. अशा प्रश्नांनी, तर काँग्रेसच्या नेत्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 

टॅग्स :ParliamentसंसदNarendra Modiनरेंद्र मोदी