शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: तुमच्यापर्यंत कशी पोहोचणार कोरोनावरील लस?; जाणून घ्या सरकारचा प्लान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 06:54 IST

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हटले की, लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवक अधिकारी, कोल्ड चेन हाताळणारे, सुपरवायझर, डाटा मॅनेजर, आशा वर्कर यांना प्रशिक्षित केले जात आहे.

-  एस. के. गुप्तानवी दिल्ली : देशात ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत दोनस्तरीय वाहतूक व्यवस्थेसह कोरोना लस देण्याचे काम केले जाईल. राज्य स्तरावर आरोग्य सचिव आणि जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांशिवाय सगळ्या जिल्ह्यांत टास्क फोर्स बनवून लसीकरण केले जाईल व लसीकरण कार्यक्रमात २३ मंत्रालये मिळून काम करतील.केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हटले की, लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवक अधिकारी, कोल्ड चेन हाताळणारे, सुपरवायझर, डाटा मॅनेजर, आशा वर्कर यांना प्रशिक्षित केले जात आहे. याशिवाय २९ हजार कोल्ड चेन पॉइंट्स व ४१ हजार डीप फ्रीजर बनवले जात आहेत. केंद्र सरकारने लसीकरण व त्याच्या तयारीसाठी दिलेल्या निर्देशांनुसार प्रत्येक पॉइंटवर एकावेळी १००-२०० जणांना लस दिली जाईल. लस दिल्यावर अर्धा तास त्याच्यावर लक्ष ठेवले जाईल. काही तक्रार असल्यास लगेच वैद्यकीय सेवा मिळेल. लसीकरण केंद्रात एका वेळी एकाच व्यक्तीला आत जाऊ दिले जाईल.लसीकरणासाठी लोकांकडून आधी नोंदणी (रजिस्ट्रेशन) करून घेतली जाईल. कोणाला आधी लस दिली जावी याचे प्राधान्य ठरवले जाईल. तात्काळ नोंदणी किंवा कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी लसीकरणासाठी चालणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, इंग्लंडमध्ये कोरोना लसीकरण करताना अनेक लोकांना आराेग्याच्या तक्रारी येत आहेत. भारतातही त्यांची शक्यता आहे. भारतात लसीकरणाच्या साइड इफेक्टशी लढणे प्रत्यक्षात आव्हानात्मक असेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर कोरोना लसीबद्दल अनेक प्रकारचे गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न होतील त्यापासून सावध राहावे.कोरोनाचा फैलाव रोखण्याबद्दल समाधान व्यक्त करून भूषण म्हणाले, भारतात ९५ टक्क्यांपेक्षा जास्त रिकव्हरी रेट झाला आहे. दिल्ली, केरळ, महाराष्ट्र, राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये आजही जास्त रुग्ण निघत आहेत. केरळ आणि महाराष्ट्रात कोरोना फैलावाबद्दल स्थिती सध्या काळजीची आहे. दिल्लीत परिस्थिती सुधारली आहे. भारतात १५ कोटी ५५ लाख चाचण्या झाल्या आहेत. ॲक्टिव्ह केस तीन लाख ४० हजारच्या जवळपास आहेत, तर ९४ लाख लोक पूर्ण बरे झाले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या