प्रतापनगरात सोनसाखळी पळविली
By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST
प्रतापनगरात सोनसाखळी पळविली
प्रतापनगरात सोनसाखळी पळविली
प्रतापनगरात सोनसाखळी पळविलीनागपूर : डिओ गाडीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन पळविणाऱ्या आरोपींविरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. के. निर्मला शंकरराव (५१) रा. अंकुर अपार्टमेंट, प्लॉट नं. २१, सरवर ले आऊट, स्वावलंबीनगर या आपल्या डिओ गाडी क्रमांक एम. एच. ३१, बीवाय-७५२४ ने जात असताना नवनिर्माण सोसायटी हनुमान मंदिराजवळ लक्ष्मीनगर येथे मोटारसायकलवर दोन अनोळखी इसम त्यांच्या मागून आले. मोटारसायकलवर बसलेल्या मागील इसमाने त्यांच्या गळ्यातील २५ हजार रुपयांची सोन्याची चेन हिसकावली. त्यानंतर आरोपी तेथून वेगाने निघून गेले. के. निर्मला शंकरराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रतापनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.