जन सुराजचे सर्वेसर्वा प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणूक (२०२५) पूर्वी अनेक मोठे दावे केले होते. पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करण्यापर्यंतची भाषा त्यांनी केली होती, मात्र निकालानंतर त्यांचा पक्ष 'झिरो'वरच बाद झाला. आता प्रशांत किशोर या पराभवावर मंथन करत आहेत. ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. याच दरम्यान त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते म्हणत आहेत की, जेवढ्या लोकांनी त्यांच्यासोबत फोटो काढले, तेवढी मतंही त्यांना मिळाली नाहीत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
हा व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. व्हिडिओमध्ये प्रशांत किशोर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. ते म्हणतात, "कोण प्रामाणिकपणे काम करत आहे, याचा पुरावा कोणाकडे आहे? जेवढ्या लोकांनी आमच्यासोबत फोटो काढले, तेवढी मतं आम्हाला मिळाली नाहीत आणि प्रत्येक माणूस हेच सांगत आहे की, 'भाऊ मीच काम केलंय, दुसऱ्याने नाही.' या बोलण्याला आता काही अर्थ उरलेला नाही."
प्रशांत किशोर मंगळवारी बेगुसराय येथे पोहोचले. यावेळी त्यांनी बिहारमधील दारूबंदी आणि वाढत्या गुन्हेगारीवरून एनडीए सरकारवर जोरदार निशाणा साधला. एनडीए सरकार निवडल्याबद्दल त्यांनी जनतेलाही सुनावलं. प्रशांत किशोर म्हणाले की, "जर दारूबंदीमुळे महिलांचं सक्षमीकरण होत असेल, तर ती संपूर्ण देशात लागू करायला हवी."
प्रशांत किशोर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, जन सुराजने तीन वर्षांपर्यंत रणनीती आखून काम केलं. जनतेने जवळपास १८ लाख मतं देऊन त्यांना सेवेसाठी निवडलं आहे, बिहार सोडून जाण्यासाठी नाही. ते जनतेच्या आदेशाचं पालन करत आहेत. ते पुढे म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून जन सुराजच्या वतीने एकच गोष्ट समजावून सांगितली जात आहे की, 'जे पेराल तेच उगवेल'. जर तुम्ही एनडीएला निवडलं, तर सरकार एनडीएच्या अजेंड्यावरच चालणार. एनडीएचा अजेंडा स्पष्ट आहे, जो संपूर्ण देश पाहत आहे.
Web Summary : Prashant Kishor, after his party's defeat in Bihar, expressed disappointment that the number of votes received didn't match the number of photos taken with supporters. He criticized the NDA government's performance and questioned the effectiveness of the alcohol ban in Bihar.
Web Summary : बिहार में हार के बाद प्रशांत किशोर ने निराशा व्यक्त करते हुए कहा कि जितने लोगों ने उनके साथ तस्वीरें खिंचवाई, उतने वोट भी नहीं मिले। उन्होंने एनडीए सरकार के प्रदर्शन की आलोचना की और बिहार में शराबबंदी की प्रभावशीलता पर सवाल उठाया।