शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 19:00 IST

Prashant Kishor Jan Suraj : निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी 'जन सुराज' नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला आहे.

Prashant Kishor Jan Suraj : प्रशांत किशोर यांनी आज(2 ऑक्टोबर) आपल्या 'जन सूराज' पक्षाची अधिकृत घोषणा केली आहे. निवडणूक रणनीतीकार म्हणून नावारुपाला आलेल्या पीकेंनी आता बिहारमधून सक्रीय राजकारणात प्रवेश केला आहे. आज, पाटण्यात आयोजित कार्यक्रमातून त्यांनी पक्ष स्थापनेची घोषणा केली. आपल्या पक्षाच्या माध्यमातून त्यांना बिहारच्याराजकारणात वादळ निर्माण करण्याची आशा आहे. दरम्यान, पीकेंनी मनोज भारती यांना पक्षाचे कार्यकारिणीचे अध्यक्ष केले आहे.

    

माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रसाद यादव, प्रशासकीय सेवेतून राजकारणात आलेले पवन वर्मा, माजी खासदार मोनाजीर हसन यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत पाटण्यात जन सुराजचा शुभारंभ करण्यात आला. उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पीके म्हणाले की, जन सुराज मोहीम अनेक दिवसांपासून सुरू आहे. पक्ष कधी काढणार, असा प्रश्न अनेकजण मला विचारत होते. आता आज निवडणूक आयोगाने अधिकृतपणे 'जन सूराज'ला पक्ष म्हणून मान्यता दिली आहे.

पक्ष स्थापनेपूर्वी पदयात्रामहात्मा गांधींनी लोकांना एकत्र आणण्यासाठी देशातील पहिला सत्याग्रह केला, त्या चंपारण येथून प्रशांत किशोर यांनी अडीच वर्षांपूर्वी राज्यभरात 3,000 किमीची 'पदयात्रा' सुरू केली होती. राज्यातील लोकांना एक नवीन पर्याय देणार, बिहारला मागासलेपणातून मुक्त करणार, असा अजेंडा घेऊन पीकेंनी आपल्या पदयात्रेला सुरुवात केली होती. या पदयात्रेत पीकेंनी संपूर्ण बिहार पिंजून काढले. आपल्या यात्रेदरम्यान पीकेंनी दर्जेदार शिक्षण, चांगल्या वैद्यकीय सेवा, राज्यात रोजगाराच्या संधी देण्यावर भर दिला. आता आज अखेर त्यांनी पक्ष स्थापन करुन सक्रीय राजकारणात प्रवेश केला आहे.

कोण आहेत मनोज भारती?

प्रशांत किशोर यांनी मनोज भारती यांना जन सूरज पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष बनवले आहे. भारतीय परराष्ट्र सेवेतून (IFS) निवृत्त झालेल मनोज भारती दलित समाजातून येतात. जन सूरज पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष निवडण्यासाठी प्रशांत किशोर यांनी 100 नावांची यादी मागवली होती. यातून मनोज यांच्या नावाची निवड करण्यात आली. पुढील वर्षी मार्चपर्यंत मनोज या पदावर राहणार आहेत.

पुढील वर्षी नवीन अध्यक्षाची निवडमनोज यांच्या निवडीची घोषणा करताना प्रशांत किशोर म्हणाले की, दलित समाजातील कोणीतरी अध्यक्ष होईल, असे आम्ही म्हटले होते. प्रत्येक समाजात एक कर्तबगार माणूस असतो, अशी आमची विचारसरणी आहे. प्रत्येकाला संधी दिली जाईल. पक्षाच्या नव्या अध्यक्षाची निवड पुढील वर्षी मार्चपर्यंत केली जाईल.

 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहारPoliticsराजकारण