शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केरळ विधानसभा काँग्रेस उमेदवारांच्या निवड समितीमध्ये प्रणिती शिंदेंना स्थान

By महेश गलांडे | Updated: March 2, 2021 22:16 IST

केरळ राज्याच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे उमेदवार छानणी समिती (स्क्रीनिंग कमिटी) च्या सदस्य पदावर आमदार प्रणिती शिंदे याची निवड केली आहे.

ठळक मुद्देकेरळ राज्याच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे उमेदवार छानणी समिती (स्क्रीनिंग कमिटी) च्या सदस्य पदावर आमदार प्रणिती शिंदे याची निवड केली आहे.

मुंबई - निवडणूक आयोगाने नुकतेच देशातील 4 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. त्यामध्ये, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पद्दुचेरी या राज्यांचा समावेश आहे. त्यापैकी, केरळ विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसच्या उमेदवार निवड समितीमध्ये महाराष्ट्राच्या काँग्रेस नेत्या आणि आमदार प्रणिती शिंदे यांना संधी देण्यात आली आहे.   केरळ राज्याच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे उमेदवार छानणी समिती (स्क्रीनिंग कमिटी) च्या सदस्य पदावर आमदार प्रणिती शिंदे याची निवड केली आहे. मंगळवार 02 मार्च 2021 रोजी आमदार प्रणिती शिंदे यांची केरळ राज्याच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार छानणी समिती (स्क्रीनिंग कमिटी) च्या सदस्य पदावर निवड करण्यात आल्याचे पत्र अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिलं आहे. तर, एच. के. पाटील हे या निवड समितीचे अध्यक्ष आहेत. प्रणिती शिंदेच्या या निवडीमुळे पुन्हा एकदा शिंदे कुटुंबीयांवर काँग्रसने विश्वास दाखवत सोलापूरवर मोठी जबाबदारी दिली आहे. तर, या समितीममध्ये त्या महाराष्ट्रातील एकमेव नेत्या आहेत. 

दरम्यान, गेल्याच महिन्यात काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांना पक्षाने जबाबदारी दिली आहे. त्यावेळीही, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष व उपाध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली. सहा. कार्यकारी अध्यक्षांमध्ये आमदार शिंदे यांचाही समावेश आहे. सोलापूरला बऱ्याच काळानंतर प्रदेश कमिटीत स्थान मिळाल्याचे माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी सांगितले.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रदेश अध्यक्ष व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून दोनवेळा पदभार सांभाळला आहे. त्यानंतर प्रदेश कमिटीवर माजी खासदार धर्मण्णा सादूल, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, यलगुलवार, रामहरी रूपनवर, कै. विष्णुपंत कोठे, हेमू चंदेले, सुधीर खरटमल यांना प्रतिनिधित्व मिळाले आहे. कार्यकारी अध्यक्षपदावर आमदार शिंदे यांच्या नियुक्तीमुळे सोलापूरला पहिल्यादांच मान मिळाला आहे.

1 जून रोजी संपणार कार्यकाळ

तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ २४ मे २०२१ रोजी, पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ ३० मे २०२१ रोजी, केरळ विधानसभेचा कार्यकाळ १ जून रोजी तर आसाम विधानसभेचा कार्यकाळ ३१ मे रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे, विधानसभेचा कार्यकाळ समाप्त होण्यापूर्वी निवडणुकांसाठी   मतदानप्रकिया पार पडणार आहे. तर, केरळ विधानसभा निवडणूकीसाठी एकाच टप्प्यात ६ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसPraniti Shindeप्रणिती शिंदे