शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

प्रणव रॉय दाम्पत्याला विदेशात जाण्यापासून मुंबई विमानतळावर रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 03:25 IST

केंद्रीय गुप्तचर खात्याच्या निर्देशानुसार कारवाई

मुंबई : विदेशात जाण्याच्या तयारीत असलेले एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणव रॉय व राधिका रॉय या दाम्पत्याला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी रोखण्यात आले व त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्यामध्ये चौकशी सुरू असल्याने केंद्रीय गुप्तचर खात्याच्या (सीबीआय) निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिली. तर बनावट व काहीच तथ्य नसलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा गैरवापर करून रॉय यांना रोखण्यात आल्याचा दावा एनडीटीव्हीतर्फे करण्यात आला. रॉय दाम्पत्य नैरोबीला जात असल्याची माहिती समोर आली आहे.रॉय दाम्पत्य विदेशात जाऊन १६ ऑगस्टला देशात परतणार होते, मात्र सीबीआयने २ वर्षांपूर्वी दाखल केलेल्या खोट्या व तथ्यहीन प्रकरणी त्यांना रोखण्यात आले. ही कारवाई माध्यमांवर अंकुश लावणारी असून इतर माध्यमांना इशारा आहे, असे कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मूलभूत अधिकारांवर करण्यात आलेले हे आक्रमण आहे. याबाबत मुंबई विमानतळाच्या प्रवक्त्याने अद्याप काहीही अधिकृत माहिती दिलेली नाही. लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अशा प्रकारे होणाºया हल्ल्यांमुळे आम्ही काहीही झज्ञले तरीही डगमगून जाणार नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. एका खासगी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात सीबीआय चौकशी करत आहे. मात्र रॉय यांना जाणीवपूर्वक या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा दावा त्यांच्यातर्फे करण्यात आला आहे.