शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या इफ्तार पार्टीला प्रणव मुखर्जींना निमंत्रण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 16:00 IST

काँग्रेससह विरोधी पक्षांनी प्रणवदांना संघाच्या व्यासपीठावर जाण्यास विरोध केला होता.

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी संघाच्या व्यासपीठावर हजेरी लावणारे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दिल्लीत काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीचे निमंत्रण न देण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसने नाराज होऊन प्रणवदांना निमंत्रितांच्या यादीतून वगळल्याची चर्चाही सुरू झाली आहे. एकीकडे काँग्रेसने या इफ्तार पार्टीसाठी सर्वपक्षीयांना आग्रहाचे निमंत्रण दिले असताना स्वत:च्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना दूर ठेवले आहे. मुखर्जी यांच्यासह माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही काँग्रेसने इफ्तार पार्टीसाठी निमंत्रित केलेले नाही. काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाकडून या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. नवी दिल्लीच्या ताज पॅलेस हॉटेलमध्ये १३ जूनला ही पार्टी होणार आहे. ज्या राजकीय पक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे त्यांना त्यांचे प्रतिनिधी पाठवण्यास सांगितले आहे.प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोप सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून हजेरी लावली होती. त्यावेळी काँग्रेससह विरोधी पक्षांनी प्रणवदांना संघाच्या व्यासपीठावर जाण्यास विरोध केला होता. परंतु, प्रणव मुखर्जी यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहत या सोहळ्याला हजेरी लावली होती.   

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीcongressकाँग्रेसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ