शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

प्रज्वल रेवण्णा परत येणार, एसआयटीपुढे उपस्थित होणार; व्हिडीओ शेअर करत स्वतः दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 11:43 IST

कथित सेक्स स्कॅण्डल उघडकीस आल्यानंतर २७ एप्रिलला प्रज्वलने जर्मनीत पलायन केले होते

बंगळुरू: कर्नाटकातील कथित सेक्स स्कॅण्डल प्रकरणातील आरोपी व जेडीएसचा निलंबित खासदार प्रज्वल रेवण्णा याने ३१ मे रोजी विशेष तपास पथकापुढे (एसआयटी) उपस्थित राहणार असल्याची माहिती व्हिडीओच्या माध्यमातून दिली. एका वृत्तवाहिनीने प्रसारित केलेल्या व्हिडीओमध्ये प्रज्वल म्हणाला, शुक्रवारी (३१ मे) सकाळी १० वाजता मी एसआयटीपुढे उपस्थित राहीन. माझ्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांना सविस्तर उत्तर देत या प्रकरणाच्या तपासात पूर्ण सहकार्य करेल. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. माझ्यावर लावलेल्या खोट्या आरोपातून माझी सुटका होईल, असा मला विश्वास आहे. दरम्यान, प्रज्वलच्या या व्हिडीओबाबत पक्षाच्या वतीने वा कुटुंबीयांकडून कोणताही दुजोरा देण्यात आला नाही.कथित सेक्स स्कॅण्डल उघडकीस आल्यानंतर २७ एप्रिलला प्रज्वलने जर्मनीत पलायन केले होते.

काँग्रेस नेत्यांवर आरोप

  • एसआयटीने मला नोटीस बजावल्यानंतर त्यावर उत्तर देण्यासाठी माझ्या वकीलांनी एक आठवड्याची मुदत मागितली होती. माझ्या उत्तराची वाट न पाहता दुसऱ्याच दिवशी कॉंग्रेस नेत्यांनी माझ्यावर आरोप करण्यास सुरुवात केली. 
  • माझी राजकीय कारकीर्द उद्ध्वस्थ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नुकतेच मी राजकारणात स्थिरस्थावर होत असताना, मला संपविण्याचा कट आखला गेला. या सर्व घडामोडी पाहता मी नैराश्यात गेलो, असे प्रज्वल याने व्हिडीओत म्हटले आहे.

प्रज्वलने कुटुंबीयांची मागितली माफी

प्रज्वलने या व्हिडीओमध्ये कुटुंबीय, आई-वडिल, आजोबा एच.डी.देवेगौडा, काका व माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्यासह राज्यातील नागरिक व पक्षातील कार्यकर्त्यांची माफी मागितली. 

टॅग्स :Karnatakकर्नाटक