शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

लाभले आम्हास ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 06:44 IST

प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला बॉलीवूडसह दक्षिणेतील अनेक दिग्गज कलाकार, उद्योगपती, क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटींची उपस्थिती होती.

अयोध्या : प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला बॉलीवूडसह दक्षिणेतील अनेक दिग्गज कलाकार, उद्योगपती, क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटींची उपस्थिती होती. या सोहळ्याला उपस्थित राहून आम्हाला भरून पावल्यासारखे झाले. या ऐतिहासिक क्षणाला आम्हाला बोलावले, आम्ही भाग्यवान आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

अशा समारंभाला उपस्थित राहणे एक सन्मान आहे. आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला असा सोहळा पाहायला मिळाला.- हेमा मालिनी, भाजप खासदार आणि अभिनेत्री

आज मी लाखो काश्मिरी हिंदूंचे प्रतिनिधित्व करत आहे ज्यांना आपली घरे सोडावी लागली. आज प्रभू राम त्यांच्या घरी परतले आहेत. आजचा दिवस भारताच्या इतिहासातील स्वर्णिम आहे. आणि मला आशा आहे की काश्मिरी पंडितही लवकरच काश्मीरला परततील. जगभरात लोक हा दिवस साजरा करत आहेत. संपूर्ण देश आज दिवाळी साजरी करीत आहे. - अनुपम खेर, अभिनेते

राम मंदिर हे भारताचे ऐतिहासिक प्रतीक बनले आहे. यापेक्षा मोठा आनंद कोणता असू शकतो? आज मी खूप आनंदी आहे. आम्ही लहानपणी स्वप्नात पाहायचो आणि अयोध्येबद्दल वाचले व ऐकले आहे. - सुभाष घई, चित्रपट निर्माते

मला रामलल्लांचे आशीर्वाद मिळाले आहेत. मला खूप बरे वाटले की मला बोलावले. जेव्हा जेव्हा मला इन्स्पेक्टरची भूमिका दिली गेली, तेव्हा माझे नाव राम होते. - जॅकी श्रॉफ, अभिनेता

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणे हा एक अद्भुत अनुभव आहे. हा दिवस संपूर्ण भारतातील लोकांसाठी बनला आहे.- चिरंजीवी, अभिनेता

रामलल्लांचे रूप सुंदर आहे. शिल्प खूप छान आहे. मला वाटते की भगवान रामांचा खरेच मूर्तीत वास झाला आहे. मी खूप भावुक झालो आणि आशीर्वाद मागितले. - विवेक ओबेरॉय, अभिनेता

हा एक ऐतिहासिक क्षण आहे, मला येथे आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप आभार. सर्वांनी इथे यावे... -  आयुष्मान खुराना, अभिनेता

एखाद्या धार्मिक स्थळी गेल्यावर काय वाटते, तेच मला वाटते. आम्हा सर्वांना हे खूप दिवसांपासून हवे होते आणि मला वाटते की या मोठ्याप्रसंगी येथे येणे खूप आनंददायी आहे. - मिताली राज, माजी क्रिकेटपटू

मन प्रसन्न झाले… मी गेली ६३ वर्षे भजने गातोय आणि आता आणखी गाणार आहे. - अनुप जलोटा, गायक

राममंदिर उत्कृष्ट सुंदर आहे. ते पाहणे प्रत्येकासाठी सन्मानाची गोष्ट आहे. - रामचरण, अभिनेता

शब्दांनी भावना व्यक्त करता येत नाहीत. आजच्या सोहळ्यानंतर मला वाटते की देश एका वेगळ्याच परिमाणात आहे.- शैलेश लोढा, अभिनेता

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर