पंजवानी मार्केटचा वीज -पाणी पुरवठा खंडित
By admin | Updated: December 21, 2014 23:49 IST
अग्निशमनच्या नियमाकडे दुर्लक्ष : कारवाईमुळे व्यापारी त्रस्तनागपूर : नियमानुसार बांधकाम नसल्याने गांधीबाग येथील पंजवानी मार्केटचा वीज व पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. मार्केट असुरक्षित असल्याने येथील वीज व पाणी पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती मनपाच्या अग्निशमन विभागाने व्यापाऱ्यांना दिली आहे. विविध कारणामुळे २००६ सालापासून ...
पंजवानी मार्केटचा वीज -पाणी पुरवठा खंडित
अग्निशमनच्या नियमाकडे दुर्लक्ष : कारवाईमुळे व्यापारी त्रस्तनागपूर : नियमानुसार बांधकाम नसल्याने गांधीबाग येथील पंजवानी मार्केटचा वीज व पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. मार्केट असुरक्षित असल्याने येथील वीज व पाणी पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती मनपाच्या अग्निशमन विभागाने व्यापाऱ्यांना दिली आहे. विविध कारणामुळे २००६ सालापासून हे मार्केट वादग्रस्त ठरले आहे. गांधीबाग कापड बाजाराच्या मागील बाजूला मोठी आग लागली होती. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या पथकाने या भागाची पाहणी केली होती. यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या. यात पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतरही कोणत्याही स्वरूपाच्या उपाययोजना न केल्याने जलप्रदाय व महावितरण विभागाने ही कार्यवाही केली आहे. तसेच ही इमारत खाली न केल्यास सामान जप्त करण्याचा इशारा मनपाने दिला आहे. (प्रतिनिधी)चौकट...ना हरकत प्रमाणपपत्र नाहीदोन इमारती मिळून पंजवानी मार्केट बनविण्यात आले आहे. येथे उतरण्यासाठी एकच शिडी आहे. पार्किगच्या जागेवर तसेच बाल्कनीतही दुकाने काढण्यात आली आहेत. आगीची घटना घडल्यास कोणत्याही स्वरूपाच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. २००१ नंतर अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही. तसेच मंजूर नकाशानुसार बांधकाम केले नसल्याचे निदर्शनास आले आहे.