शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतींच्या भाषणादरम्यान बत्ती गुल, 9 मिनिटे अंधारात भाषण देत राहिल्या द्रौपदी मुर्मू, चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 17:18 IST

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणाच्या वेळी 9 मिनिटे वीज खंडित झाल्याचा सर्वजण निषेध करत आहेत. 

ओडिशामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणादरम्यान बत्ती गुल झाल्याचे समोर आले आहे. महाराजा श्री रामचंद्र भंजदेव विद्यापीठाच्या 12 व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती संबोधित करत होत्या, त्यावेळी वीज गेली. त्यानंतर राष्ट्रपतींनी आपले भाषण अंधारात सुरूच ठेवले. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणाच्या वेळी 9 मिनिटे वीज खंडित झाल्याचा सर्वजण निषेध करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतींच्या कार्यक्रमादरम्यान शनिवारी सकाळी 11.56 ते दुपारी 12.05 वाजेपर्यंत नऊ मिनिटे वीज खंडित झाली होती. वीज नसल्याने संपूर्ण सभागृहात अंधार होता. मात्र, या अंधारातही राष्ट्रपतींनी आपले भाषण सुरूच ठेवले. वीज खंडित झाल्यानंतरही द्रौपदी मुर्मू यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करणे थांबवले नाही. त्या हसत हसत म्हणाल्या की,  "आजचा हा कार्यक्रम बघून विजेलाही आमचा हेवा वाटू लागला आहे. आपण अंधारात बसलो आहोत पण अंधार आणि प्रकाश दोन्ही बरोबरीने घेऊ."

दुसरीकडे, राष्ट्रपतींच्या कार्यक्रमादरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याने वीज विभागाने आपल्या चुकीबद्दल खेद व्यक्त केला आहे. माहिती व जनसंपर्क विभागानेही चूक मान्य केली आहे. दरम्यान, राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती प्रोफेसर गणेशी लाल, मंत्री प्रदीप कुमार अमत आणि कुलगुरू संतोष त्रिपाठीही उपस्थित होते.

चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापनदरम्यान, ही वीज खंडित होण्याची घटना लोक सहजासहजी स्वीकारत नाही आहेत. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमातही वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटनेचा लोकांकडून निषेध केला जात आहे. या घटनेनंतर मयूरभंज जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीसाठी त्रिसदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली आहे.

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मू