बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर खड्डे
By admin | Updated: July 26, 2015 23:38 IST
बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर खड्डे
बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर खड्डे
बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर खड्डेप्रवासी त्रस्त : पारशिवनी येथील प्रकारपारशिवनी : स्थानिक बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारालगत ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले असल्याने रहदारीला अडथळा होत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर खड्डे पडले असल्यामुळे कित्येकदा विद्यार्थी व वयोवृद्ध नागरिक या खड्ड्यात पडून जखमी झाले आहेत. ऐन प्रवेशद्वासमोर असलेल्या खड्ड्यांकडे ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे किरकोळ अपघात वाढले आहेत. या ठिकाणातील खड्डे तत्काळ बुजविण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सागर सायरे, सलीम बाघाडे आदींनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)