शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये तब्बल ७० दिवसांनंतर खणाणले मोबाईल, पोस्टपेड सेवेवरील निर्बंध मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 12:41 IST

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये सरकारने खोऱ्यातील सर्व प्रकारच्या मोबाईल सेवा बंद केल्या होत्या.

श्रीनगर - तब्बल ७० दिवसांच्या खंडानंतर आजपासून काश्मीरमध्ये पुन्हा एकदा मोबाइल फोन खणाणू लागले आहेत. पोस्टपेड मोबाईल सेवेवरील निर्बंध हटवण्यात आल्यानंतर सोमवारी दुपारपासून खोऱ्यातील सुमारे ४० लाख हून अधिक फोन सुरू झाले आहेत. वास्तविक काश्मीर खोऱ्यामधील मोबाईल सेवा शनिवारीच पूर्ववत करण्यात येणार होती. मात्र शेवटच्या क्षणी निर्माण झालेल्या तांत्रिक अडथळ्यांमुळे हा निर्णय लांबणीवर टाकावा लागला होता.  

काश्मीरमधील राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी पोस्टपेड सेवेवरील निर्बंध हटवण्याची घोषणा केली होती, त्यानंतर आजपासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी काश्मीरमधील रहिवाशांना मोबाइल इंटरनेटसाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. तसेच प्रीपेड मोबाईल सेवा सुरू करण्याबाबतचा निर्णयही मागाहून होणार आहे. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये सरकारने खोऱ्यातील सर्व प्रकारच्या मोबाईल सेवा बंद केल्या होत्या. मोबाईल सेवा बंद असल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील सत्तर लाख नागरिकांना गैरसोय सोसावी लागत होती. तसेच या निर्णयामुळे राज्य प्रशासनावर टीकाही होत होती. 

कलम ३७० हटवल्यानंतर  काश्मीर खोऱ्यातीलच मोबाईल सेवा बंद करण्यात आली होती होती. जम्मू आणि लडाख या भागात मोबाईल सेवा सुरू होती.  दरम्यान, काश्मीर खोरे पर्यटकांसाठी खुले करण्याचे निर्देश केंद्र सरकारने नुकतेच दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाने पोस्टपेड मोबाईल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMobileमोबाइल