शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? टपाल तिकिटावर छापला चक्क छोटा राजन, मुन्ना बजरंगीचा फोटो 

By कुणाल गवाणकर | Updated: December 28, 2020 13:54 IST

कानपूर टपाल कार्यालयाकडून टपाल तिकिटं जारी

नवी दिल्ली: टपाल तिकिटावर गुंड, माफियांचे फोटो छापले जाऊ शकतात का, या प्रश्नाचं आदर्श उत्तर नाही असंच देता येईल. पण व्यवस्थेत त्रुटी असल्यास काहीही होऊ शकतं. कानपूरमधील मुख्य टपाल कार्यालयात हेच घडलं आहे. कानपूरच्या मुख्य टपाल कार्यालयातून आंतरराष्ट्रीय डॉन छोटा राजन आणि बागपत तुरुंगातील गँगवॉरमध्ये मारला गेलेला मुन्ना बजरंगी यांचे फोटो असलेली टपाल तिकिटं जारी करण्यात आली आहेत. या तिकिटांच्या मदतीनं पत्र पाठवली जाऊ शकतात.भारतीय टपाल विभागानं 'माय स्टँप' योजनेच्या अंतर्गत छोटा राजन आणि मुन्ना बजरंगी यांचे फोटो असलेले टपाल तिकिटं छापली आहेत. पाच रुपयाचं मूल्य असलेली छोटा राजनची १२, तर मुन्ना बजरंगीची १२ तिकिटं छापण्यात आली आहेत. टपाल विभागाला यासाठी ६०० रुपयांचं शुल्क मिळालं आहे. तिकिटं छापण्याआधी फोटोंची पडताळणी गरजेची होती. मात्र टपाल विभागानं कोणत्याही प्रकारची पडताळणी केली नाही.नेमकी काय आहे माय स्टँप योजना?२०१७ मध्ये मोदी सरकारनं माय स्टँप योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून एखादी व्यक्ती ३०० रुपये शुल्क भरून स्वत:चा किंवा स्वत:च्या कुटुंबीयांचा फोटो टपाल तिकिटावर छापून घेऊ शकते. शुल्क जमा केल्यावर टपाल विभाग १२ तिकिटं जारी करतो. ही तिकिटं इतर टपाल तिकिटांप्रमाणेच असतात. त्यांचा वापर करून तुम्ही देशात कोणालाही पत्र पाठवू शकता.तिकीट मिळवण्याची प्रक्रिया बरीच मोठीपोस्टाचं तिकीट तयार करण्याची प्रक्रिया बरीच मोठी आहे. त्यासाठी अर्जदाराला पासपोर्ट आकाराचा फोटो आणि संपूर्ण माहिती द्यावी लागेल. त्याच्याकडून एक अर्ज भरून घेण्यात येतो. हृयात असलेल्या व्यक्तीचं तिकीट छापलं जातं. त्या व्यक्तीला सत्यापित करण्यासाठी स्वत: टपाल कार्यालयात जावं लागतं. याशिवाय स्वत:सोबत फोटो, आधार कार्ड, वाहन परवाना आणि मतदार ओळखपत्र न्यावं लागतं. या सगळ्याची झेरॉक्स जमा करावी लागते. त्यानंतर पडताळणी करून पोस्टाचं तिकीट जारी केलं जातं.

टॅग्स :Chhota Rajanछोटा राजन