शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन औषध विक्रीसंदर्भातील नियम चार महिन्यांत अधिसूचित करण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 03:43 IST

केंद्र सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

मुंबई : ऑनलाइन औषध विक्रीसंदर्भातील नियमावलींचा मसुदा तयार असून, तो लवकरच अंतिम करण्यात येईल आणि येत्या चार महिन्यांत तो अधिसूचित करण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली.मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत, ऑनलाइन औषधविक्रीसंबंधीच्या नियमांचा मसुदा तयार केला असून, ३१ जानेवारीपर्यंत अंतिम नियमावली तयार होईल, असे आश्वासन केंद्र सरकारने डिसेंबर, २०१८ मध्ये उच्च न्यायालयाला दिले होते. मात्र, केंद्र सरकारने अद्याप या आश्वासनाचे पालन केलेले नाही.केंद्र सरकारने बुधवारच्या सुनावणीत नियमांच्या मसुद्यावर हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले. मात्र, हे नियम चार महिन्यांत अधिसूचित करण्यात येतील, अशी अपेक्षा आहे, असे केंद्र सरकारच्या वकिलांनी मुख्य न्या. प्रदीप नंद्राजोग व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठला सांगितले.केंद्र सरकारने रातोरात जम्मू व काश्मीरवर लावण्यात आलेले ३७० कलम हटविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने म्हटले की, तुम्ही (केंद्र सरकार) एका रात्रीत निर्णय घेता, मग यासाठी चार महिन्यांचा कालावधी कशाला हवा? ग्रामीण भागात लोकांना औषधे मिळत नाहीत.डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय जी औषधे देण्यास मनाई आहे, अशा औषधांचीही आॅनलाइन विक्री होते. त्यावर कडक निर्बंध घालावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका नवी मुंबईच्या रहिवासी व महाविद्यालयाच्या प्राध्यापक मयुरी पाटील यांनी २०१५ मध्ये उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

टॅग्स :medicineऔषधं