शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 05:19 IST

सोनिया गांधी आपल्या आरोग्याशी संबंधित काही चाचण्यांसाठी अमेरिकेकडे रवाना होत असल्यामुळे पक्षातील बदलांना काही काळ विराम देण्यात आला आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्ष संघटनेत फेरबदल सुरू केले असून, उच्चपदस्थ सूत्रांनुसार, महाराष्टÑासह अन्य राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा सोनिया गांधी उपचारानंतर स्वदेशात परतल्यानंतर होण्याची शक्यता आहे.सोनिया गांधी आपल्या आरोग्याशी संबंधित काही चाचण्यांसाठी अमेरिकेकडे रवाना होत असल्यामुळे पक्षातील बदलांना काही काळ विराम देण्यात आला आहे.राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांना बदलून त्यांच्या जागी मल्लिकार्जुन खरगे यांची नेमणूक करण्यावर विचारमंथन सुरू आहे. तथापि, राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांचेही नाव चर्चेत आहे; परंतु खरगे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्याबाबत सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याकडून विचार होऊ शकतो, असे उच्चपदस्थ सूत्रांचे म्हणणे आहे.याबरोबरच अनेक राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणार असून, त्याबाबत तयारी सुरू आहे. सोनिया गांधी स्वदेशात परतल्यानंतर संपूर्ण चित्र त्यांच्यासमोर मांडण्यात येईल व त्या तात्काळ निर्णय घेऊशकतील.राहुल गांधी समर्थकांना मिळाले स्थान- सोनिया गांधी जी टीम तयार करीत आहेत त्याला राहुल गांधी यांची सहमतीही प्राप्त आहे. शुक्रवारी जे फेरबदल करण्यात आले, त्यांची घोषणा सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या चर्चेनंतर झाली. त्यामुळे या फेरबदलात राहुल गांधी समर्थक युवा नेत्यांना मोठ्या प्रमाणावर स्थान मिळाले आहे.- रणदीप सुरजेवाला, जितीन प्रसाद, माणिक टागोर, गौरव गोगोई, जितेंद्र सिंह, राजीव शुक्ल, विवेक बन्सल, मनीष चतरथ ही नावे त्यात समाविष्ट आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेस