नवी दिल्ली : राष्ट्रीय नेमपटू तारा शाहदेवला फसवून लग्न करणे व धर्म बदलण्यासाठी बळजबरी करण्याच्या आरोपात रंजीतकुमार कोहली ऊर्फ रकीबुल हुसेनला आज दिल्लीच्या एका न्यायालयाने तीन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर झारखंड पोलिसांच्या स्वाधीन केले. मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट सतीश कुमार अरोरा यांनी कोहली व त्याच्या ६५ वर्षांच्या आईला ट्रान्झिट रिमांडवर पाठविले व या दोघांना तीन दिवसात संबंधित न्यायालयात हजर करावे, असे पोलिसांना सांगितले. कोहलीला दिल्ली व झारखंड पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात आणले होते (लोकमत न्यूज नेटवर्क)
कोहली झारखंड पोलिसांच्या ताब्यात
By admin | Updated: August 28, 2014 02:38 IST