शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

'दिल्लीत पॉझिटीव्ह, जयपुरात निगेटीव्ह', फोटो शेअर करत खासदारानेच व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 18:01 IST

संसदेतील अधिवेशनाच्या अगोदर सर्वच खासदारांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये लोकसभा सभागृहातील 17 खासदारांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

ठळक मुद्देसंसदेतील अधिवेशनाच्या अगोदर सर्वच खासदारांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये लोकसभा सभागृहातील 17 खासदारांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेच्या शन आजपासून सुरू झाले असून, कामकाज सुरू होण्यापूर्वी आलेल्या अहवालानुसार लोकसभेच्या तब्बल 17 खासदारांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले आहे.  मात्र, कोरोना अहवालाच्या चाचणीवरुन एका खासदारानेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन चाचणीचे दोन्ही अहवाल शेअर करत नेमका कोणता अहवाल खरा धरावा, असा प्रश्न खासदार हनुमान बेनीवाल यांनी विचारला आहे. 

संसदेतील अधिवेशनाच्या अगोदर सर्वच खासदारांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये लोकसभा सभागृहातील 17 खासदारांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. कोरोनाबाधित झालेल्या खासदारांमध्ये सर्वाधिक भाजपाचे खासदार असून त्यांची संख्या बारा आहे. वायएसआर काँग्रेसच्या 2, शिवसेना, डीएमके आणि आरएलपी पक्षाच्या प्रत्येकी एक खासदारास कोरोनाची लागण झाली आहे. आज सकाळी या सर्वच खासदारांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने संसद परिसरात कोरोनाची चर्चाही चांगलीच रंगली आहे. तर, दुसरीकडे दिल्लीत पॉझिटीव्ह आलेल्या खासदाराची कोरोना चाचणी जयपुरात निगेटीव्ह आली आहे.  

कोरोना अहवाल आणि चाचण्यांबद्दल अनेकदा संभ्रम निर्माण करणारे अहवाल आले आहेत. कित्येकदा एकीकडे पॉझिटीव्ह तर दुसरीकडे निगेटीव्ह अहवाल आल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, आता चक्क खासदार महोदयांसोबतही असाच प्रकार घडला आहे. त्यामुळे, कोरोना चाचणीच्या अहवालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अधिवेशनापूर्वी चाचणी केलेल्या खासदारांमध्ये भाजपाच्या मिनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे, हनुमंत बेनीवाल यांच्यासह 12 खासदार पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये, हनुमान बेनीवाल यांनी 11 सप्टेंबरला कोरोना चाचणीसाठी सॅम्पल दिले होते. त्यानंतर, लोकसभा सचिवालयातून त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे सांगण्यात आले. 

खासदार हनुमान बेनीवाल यांनी स्थानिक डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुन्हा एकदा जयपूरमध्ये आपली कोरोना चाचणी केली. त्यामध्ये, त्यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे, गोंधळलेल्या खासदार बेनीवाल यांनी आपल्या दोन्ही चाचण्यांचे अहवाल ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. तसेच, नेमका कोणता रिपोर्ट खरा धरायचा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. 

संसदेचं अधिवेशन आजपासून 

संसदेचं अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. तत्त्पूर्वी केंद्रीय मंत्र्यांच्याही कोरोना चाचण्या करण्यात येत असून त्यातील काही मंत्र्यांच्या चाचण्या अद्याप बाकी आहेत. अधिवेशन सुरू होण्याच्या ३ दिवस आधी खासदारांना कोरोना चाचणी करून घ्यावी, असे त्यांना सांगण्यात आले होते. अधिवेशनाआधीची सर्वपक्षीय बैठक कोरोना साथीमुळे यंदा रद्द करण्यात आली. बैठकीची संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी तयारी केली होती. कोरोना साथीमुळे प्रश्नोत्तराच्या तासाचा कालावधी अर्ध्या तासावर आणण्यात आला आहे. प्रश्नांची उत्तरेही लेखी स्वरूपात दिली जातील. फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे असल्याने राज्यसभा चेंबर, गॅलरी, लोकसभा चेंबर येथे खासदारांच्या बसण्याची सोय करण्यात आली आहे. सभागृहाचे कामकाज व सदस्याचे भाषण नीट ऐकता यावे यासाठी दोन्ही सभागृहांच्या गॅलरीमध्ये स्क्रीन लावण्यात आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMember of parliamentखासदारMumbaiमुंबईlok sabhaलोकसभाjaipur-pcजयपूर