शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

Porn Website Ban: केंद्र सरकारचा आदेश; 67 पॉर्न वेबसाइट बॅन, नवीन IT नियमांतर्गत कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 14:35 IST

केंद्र सरकारने पॉर्न साइटविरोधात मोठी कारवाई केली आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकारने पॉर्न साइटविरोधात मोठी कारवाई केली आहे. इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यांना 2021 मध्ये जारी केलेल्या नवीन माहिती तंत्रज्ञान (IT) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 67 पॉर्न वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत. इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये, दूरसंचार विभागाने (DoT) कंपन्यांना पुणे न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे 63 वेबसाइट, तर उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे आणि मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशांच्या आधारे चार वेबसाइट बंद करण्यास सांगिल्या आहेत. 

DoT ने 24 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले की, "माहिती तंत्रज्ञान (मध्यवर्ती मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम-2021 हे उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या नियम-3(2)(b) सह वाचले गेले आहे.) विभागाच्या आदेशानुसार आणि नमूद केलेल्या वेबसाइटवर महिलांविषयी आक्षेपार्ह कंटेट आढळल्याप्रकरणी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या वेबसाइट्स/यूआरएल त्वरित ब्लॉक करण्याचा आदेश जारी केला आहे.''

3 वर्षांपूर्वी 827 वेबसाइट बॅन केल्या होत्या 2018 मध्येही सरकारने उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इंटरनेट सेवा प्रदाते (ISPs) यांना अश्लील कंटेट दाखवणाऱ्या 827 वेबसाइट्स बंद करण्याचे निर्देश दिले होते. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हा आदेश जारी केला होता. 857 साइटची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 30 वर अश्लील कंटेट आढळून आला नाही. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारInformation & broadcasting ministryमाहिती व प्रसारण मंत्रालय