शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

देशातील सर्वात गरीब लोकसभा उमेदवार, बँक खात्यात एकही रुपया नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 07:31 IST

पायी फिरूनच प्रचार : ना सोने-नाणे ना रोख रक्कम

मेरठ : मुजफ्फरनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे वकील मंगेराम कश्यप (५१ वर्षे) यांच्या बँकखात्यात शून्य शिल्लक असून, त्यांच्याजवळ रोख स्वरूपात एक रुपयाही नाही. या निवडणुकांतील ते सर्वात गरीब उमेदवार असावेत. पायी फिरून आपला प्रचार करण्यावर त्यांचा भर आहे.

मुजफ्फरनगर न्यायालयात वकिली करणारे मंगेराम २००० सालापासून मजदूर किसान युनियन पार्टीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवत आले आहेत. या पक्षाचे एक हजार कार्यकर्ते असून त्यातील बहुतेक जण मोलमजुरी करतात. मंगेराम कश्यप यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्यांच्याकडे सोनेनाणे, रोख रक्कम काहीही नसून बँक खात्यात शून्य शिल्लक आहे. त्यांची पत्नी बबिता कश्यप यांचीही आर्थिक अवस्था तशीच आहे. मंगेराम यांच्या मालकीचा १००चौरस यार्डाचा एक भूखंड असून, त्याची किंमत ५ लाख रुपये आहे. ६० यार्डाच्या भूखंडावर बांधलेल्या घराची किंमत १५ लाख रुपये आहे. ते घर त्यांना सासरच्या मंडळींनी भेट स्वरूपात दिले आहे. त्यांच्याकडे एक बाइक असून, तिची किंमत ३६ हजार रुपये आहे..

मंगेराम कश्यप यांनी सांगितले की, बाइकच्या पेट्रोलचा खर्च मला परवडत नाही. माझी पत्नी गृहिणी असून आम्हाला दोन मुले आहेत. गुजराण करण्यासाठी मी दुसरी नोकरी शोधण्याचा केलेला प्रयत्नही असफल ठरला. त्यामुळे पायी फिरून प्रचार करण्यावरच मी भर दिला आहे. अनेक उमेदवार स्वत:च्या प्रचारावर खर्च करत असलेला प्रचंड पैसा खरे तर गरिबांच्या कल्याणासाठी वापरता येईल.मंगेराम यांनी लढविलेल्याप्रत्येक निवडणुकीत त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. आपण कधी ना कधी नक्कीच निवडूनयेऊ हे त्यांचे स्वप्न नजीकच्या काळात पूर्ण व्हायची मुळीच शक्यता नाही. मात्र, तरी यंदा आपल्याला यशमिळेल, अशी आशा त्यांच्या मनात जिवंत आहे. (वृत्तसंस्था)मतदारांसाठी पेन्शन योजनामुजफ्फरनगर मतदारसंघात ते भाजपचे संजीव बलियान, रालोदचे अजितसिंह यांसारख्या तगड्या उमेदवारांविरुद्ध रिंगणात उतरले आहेत. राजकारणी नेता गरिबांकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. मी गरिबांना मदत करायला नेहमीच तत्पर असतो. मतदारांसाठी मी पेन्शन योजना राबवेन, म्हणजे कोणत्याही माणसाला पैशासाठी वणवण करावी लागणार नाही, असेही मंगेराम कश्यप यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmuzaffarpur-pcमुजफ्फरपूरElectionनिवडणूक