नवी दिल्ली : प्रत्यक्षात पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या जमिनी भारतात असल्याचे भासवून त्यांच्या वापरासाठी भारतीय लष्कराकडून भाडे वसूल करण्याचीा काश्मिरमधील महसुली कर्मचाऱ्यांनी लबाडी उघड झाली असून अशा एकूण नऊ प्रकरणांचा तपास सुरु असल्याची धक्कादायक माहिती राज्यसभेत देण्यात आली.एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, अशा एकूण नऊ प्रकरणांपैकी एका प्रकरणात राज्याच्या दक्षता विभागाने तर दोन प्रकरणांत सीबीआयने एफआयआर नोंदविले आहेत. बाकीच्या प्रकरणांची सीबीआय गोपनीय पद्धतीने शहानिशा करीत आहे.जेटली यांनी दिलेल्या तपशिलानुसार यापैकी एक प्रकरण काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील खांबा गावातील २६५ कर्नाल व एक मर्ला जमिनीशी संबंधित आहे. ही जमिन १ एप्रिल १९७२ पासूव पाकिस्तानच्या कब्जेवहिवाटीत असूनही त्या जमिनीच्या वापरापोटी भारतीय लष्कराकडून मार्च २००३ पर्यंत भाडे वसूल केले गेले आहे. (र्नाल व मर्ला हे काश्मिरमधील जमीन मोजणीची एकके आहेत.) ही जमीन भारताच्या ताब्यात असल्याचे दाखविणारे बनावट महसुली दस्तावेज यासाठी तयार केले गेले, असे राज्याच्या दक्षता विभागाने केलेल्या तपासात आढळून आले.कारवाई थांबली‘सीबीआयने एफआयआर नोंदविलेली प्रकरणेही खांबा गावातील जमिनींचीच आहेत. त्यापैकी एक जमिन १२२ कर्नाल १८ मर्ला एवढी आहे तर दुसरी जमीन २५८ कर्नाल व १३ मर्ला एवढया आकाराची आहे. ‘यापैकी पहिल्या प्रकरणात जानेवारीत एफआयआर नोंदविल्यानंतर एक संशयित जम्मू-काश्मीर हायकोर्टात गेल्याने पुढील कारवाई थांबली आहे.
पाकव्याप्त जमिनीचे भाडे भारतीय सैन्याकडून!
By admin | Updated: April 12, 2017 00:45 IST