शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळे की आणखी कोणते कारण? मनोज सोनी यांनी अचानक सोडले 'यूपीएससी'चे अध्यक्षपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 06:31 IST

परीविक्षाधीन (प्रोबेशनरी) आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षेत केलेले कारनामे समोर आल्यानंतर 'यूपीएससी'वर चहूबाजूंनी टीका होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) अध्यक्ष मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोनी यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली. वास्तविक सोनी यांचा कार्यकाळ मे २०२९ पर्यंत होता. पाच वर्षांचा कार्यकाळ बाकी असताना त्यांनी राजीनामा दिला. 

परीविक्षाधीन (प्रोबेशनरी) आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षेत केलेले कारनामे समोर आल्यानंतर 'यूपीएससी'वर चहूबाजूंनी टीका होत आहे. यूपीएससीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर सोनी यांनी राजीनामा दिला आहे. तथापि, सोनी यांच्या राजीनाम्याचा खेडकर प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे यूपीएससीच्या सूत्रांनी म्हटले आहे.

कोण आहेत सोनी? शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध ५९ वर्षीय मनोज सोनी हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. यूपीएससीमध्ये नियुक्तीआधी ते गुजरातच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्याआधी ते बडोद्यातील महाराजा सयाजीराव विद्यापीठाचे कुलगुरू होते. १६ मे २०२३ रोजी त्यांनी यूपीएससी अध्यक्षपदाची शपथ घेतली होती.

१५ दिवस आधीच...सोनीनी १५ दिवस आधीच राजीनामा दिला होता. तो आता स्वीकारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यूपीएससी अध्यक्ष बनण्यास सोनी उत्सुकच नव्हते.

ही तर हकालपट्टी : खरगे

मनोज सोनी यांनी राजीनामा दिला नसून यूपीएससीतील घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांना पदावरून दूर करण्यात आल्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग