महेश खरे सुरत : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी आता काँग्रेस, भाजपसह अपक्ष व अन्य प्रादेशिक पक्षांचे उमेदवार बूथ मॅनेजमेंटच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांना तैनात करण्याच्या तयारीत आहे. भाजप एक वर्षांपासून बूथ मॅनेजमेंटवर काम करत आहे. कच्छ, दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रच्या २४,६८९ बूथवर प्रति बूथच्या हिशेबाने २० तरुणांची नियुक्ती भाजपाने केली आहे. बूथ व्यवस्थापनात भाजपने काँग्रेसला मागे सोडले आहे. भाजपसह आरएसएस व अन्य सहयोगी संघटनांच्या तरुणांची फौजच तयार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी प्रतिष्ठेची झालेल्या गुजरातच्या परीक्षेत कोण पास होते, याकडे सगळ्यांच्या नजरा असून, पहिल्या टप्प्याचे मतदान शनिवारी होणार आहे.
पहिल्या टप्प्याचे आज मतदान, दक्षिण गुजरातमध्ये काट्याची लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 05:45 IST