शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्ष ईव्हीएमला करतात बळीचा बकरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:02 IST

प्रत्येक निवडणुकीनंतर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनच्या (ईव्हीएम) नावाने खडे फोडणाऱ्या राजकीय पक्षांना मुख्य निवडणुक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी खडे बोल सुनावले. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजकीय पक्ष ईव्हीएमला बळीचा बकरा बनवतात कारण ते मशिन बोलू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

कोलकाता : प्रत्येक निवडणुकीनंतर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनच्या (ईव्हीएम) नावाने खडे फोडणाऱ्या राजकीय पक्षांना मुख्य निवडणुक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी खडे बोल सुनावले. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजकीय पक्ष ईव्हीएमला बळीचा बकरा बनवतात कारण ते मशिन बोलू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.रावत म्हणाले, जे राजकीय पक्ष आपला पराभव मनमोकळेपणाने स्वीकारू शकत नाही ते दुसºयांवर आरोप करतात. मतदानासाठी मतपत्रिका पुन्हा वापरात आणल्या जाण्याची अजिबात शक्यता नाही. ईव्हीएम यंत्रणेमध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत. ज्या ज्या वेळी ईव्हीएमसंदर्भात आक्षेप घेतले गेले त्यावेळी निवडणुक आयोगाने त्याचे योग्य शब्दांत निराकरण केलेले आहे. निवडणुकीतील मतदान पद्धतीची पारदर्शकता व विश्वासार्हता वाढावी म्हणून यापुढे ईव्हीएमबरोबरच व्हेरिफिएबल पेपर ट्रान्सपरन्सी आॅडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) यंत्रांचा वापर केला जाईल, हे गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये जाहीर करण्यात आले होते. देशात मतदान यंत्रणेचा व्याप मोठा असूनही मतमोजणीनंतर काही तासांतच निवडणूक आयोग निकाल जाहीर करतो ते या विश्वासार्ह यंत्रणेमुळेच....तर घटनादुरुस्ती करावी लागेलरावत म्हणाले की, लोकसभा व विधानसभा यांच्या निवडणुका एकत्र घेण्यात याव्यात असा प्रस्ताव २०१५ साली केंद्र सरकारने दिला होता. त्यावर निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली होती. अशा एकत्र निवडणुका घेण्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल तसेच कायदेही बदलावे लागतील. तेवढ्या प्रमाणात संसाधनेही उपलब्ध हवीत. हे सारे केंद्र सरकारला कळविले होते पण त्यानंतर काय झाले हे आयोगाला अद्याप कळलेले नाही.त्याची कल्पना नाहीमुदतपूर्व लोकसभा निवडणुका घेण्यासंदर्भात केंद्र सरकारने अद्याप निवडणूक आयोगाला काहीही कळविलेले नाही. कायद्यातील तरतुदीनूसार कोणत्याही सभागृहाचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिने आधी त्याच्याशी संबंधित निवडणुकांची अधिसूचना निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध केली जाते.

टॅग्स :Politicsराजकारण