शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
3
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
4
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
5
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
6
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
7
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
9
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
10
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
11
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
12
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
13
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
14
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
15
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
16
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
17
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
18
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
19
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
20
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."

राजकीय महानाट्यांनी दिल्ली तापली

By admin | Updated: January 21, 2015 01:26 IST

अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वातावरण मंगळवारी अनेक राजकीय महानाट्यांनी तापले.

अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वातावरण मंगळवारी अनेक राजकीय महानाट्यांनी तापले. एकीकडे आपप्रमुख अरविंद केजरीवाल यांना समर्थकांच्या गर्दीमुळे उमेदवारी अर्ज भरता आला नाही तर दुसरीकडे भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांच्या समर्थकांनी उमेदवारी न मिळाल्याच्या निषेधार्थ पक्षाच्या कार्यालयात गोंधळ घातला. खुल्या चर्चेच्या आव्हानावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच निवडणूक आयोगाने सक्रिय होत ‘चुकीची वक्तव्ये करण्यापासून खबरदार...!’ असा इशारा देणारी नोटीस बजावली. एकूणच निवडणूक नाट्यांमुळे राजधानी नवी दिल्लीची थंडी मंगळवारी कुठच्या कुठे पळून गेली होती. नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेसाठी भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आम आदमी पार्टीचे(आप) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिलेले खुल्या चर्चेचे आव्हान धुडकावून लावत आपण केवळ विधानसभेत चर्चा करू, असे स्पष्ट केले आहे़ याउलट काँग्रेस नेते अजय माकन यांनी मात्र अशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे़काल भाजपा नेतृत्वाने माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार घोषित केले होते़ यानंतर मंगळवारी दिल्लीतील निवडणूक वातावरण आणखी तापलेले दिसले़ आम आदमी पार्टी आणि भाजपा यांच्यातील संघर्षही आणखी तीव्र झालेला दिसला़ केजरीवाल यांनी भाजपा आणि काँग्रेसला खुल्या चर्चेचे आव्हान दिले़ मतदानापूर्वी अशी खुली चर्चा एक चांगली सुरुवात असेल कारण यामुळे दिल्लीच्या मुद्यांबाबत मुख्य पक्षांच्या योजना आणि धोरणांबाबत लोकांना कळू शकेल, असे केजरीवाल म्हणाले़ अर्थात किरण बेदी यांनी थेटपणे केजरीवालांचे आव्हान स्वीकारणे टाळले़ मी आव्हान स्वीकारते पण मी केवळ विधानसभेतच चर्चा करेल़ निवडणूक प्रचारादरम्यान नाही़, असे बेदी म्हणाल्या़ काँग्रेसचे अजय माकन यांनी केजरीवालांच्या खुल्या चर्चेच्या आव्हानाचे स्वागत केले आहे, याकडे लक्ष वेधले असता, ते सर्व नाटक करण्यात गुंतले आहेत़ त्यांची हातमिळवणी आहे, असे बेदींनी स्पष्ट केले़ यानंतर आम आदमी पार्टीने किरण बेदींच्या या ‘नकारा’वर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली़ (लोकमत न्यूज नेटवर्क)च्आप नेते अरविंद केजरीवाल यांनी भाजपाच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांना चर्चेचे खुले आव्हान दिले, मात्र केजरीवालांना कामापेक्षा चर्चेतच अधिक रस असल्याचा टोला लगावत बेदी यांनी हे आव्हान धुडकावले.किरणजी, कृपया मुझे अन ब्लॉक कर देंच्किरणजी, मी आपल्याला टिष्ट्वटरवरून फॉलो करीत आलो आहे़ मात्र आता आपण मला टिष्ट्वटरवर ‘ब्लॉक’ केले आहे़ कृपया मला ‘अनब्लॉक’ करावे, अशी विनंती सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय राहणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी किरण बेदी यांना केली आहे़केजरीवाल अर्ज न भरताच परतलेनवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना गर्दीच्या प्रचंड रेट्यामुळे मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज भरता आला नाही़ ते बुधवारी उमेदवारी अर्ज भरतील़ वाल्मिकी मंदिरापासून केजरीवालांचा रोड शो सुरू झाला़ उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांना दोन वाजेपर्यंत शहाजहां मार्गावरील जामनगर हाऊसमधील एसडीएम चाणक्युपरी कार्यालयात पोहोचायचे होते़ मात्र प्रचंड गर्दीमुळे केजरीवालांचा रोड शो पुढेच सरकू शकला नाही व त्यांना उमेदवारी अर्ज न भरताच परतावे लागले़ दरम्यान किरण बेदी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत़ भाजपा मुख्यालयात इच्छुकांचा गोंधळदिल्लीतील भाजपा मुख्यालयी मंगळवारी तिकीट इच्छुकांच्या गोंधळाचे ‘महानाट्य’ पाहायला मिळाले़ पक्षाचे दिल्लीचे अध्यक्ष सतीश उपाध्याय यांना तिकीट न दिल्याच्या विरोधात त्यांच्या समर्थकांनी भाजपा कार्यालयाबाहेर गोंधळ घालत़ पक्षनेतृत्वाविरूद्ध जोरदार घोषणाबाजी केली़ भाजपाच्या तिकिटासाठी इच्छूक असलेल्या शिखा राय,अभय दुबे यांचे समर्थकही आपल्या नेत्यांना तिकीट नाकारण्यात आल्याच्या निषेधार्थ पक्ष नेतृत्वाविरोधात घोषणाबाजी करताना दिसले़ उपाध्याय यांनी आपल्या समर्थकांना शांत करण्याचे प्रयत्न केले़ मात्र समर्थकांनी उपाध्याय यांना महरौली मतदारसंघातून तिकीट देण्याची मागणी करीत घोषणाबाजी सुरूच ठेवली़ प्रचारासाठी रिंगणातून बाजूला झालो -उपाध्यायआपल्या समर्थकांना शांत करताना निवडणूक न लढण्याचा निर्णय माझा स्वत:चा असल्याचे उपाध्याय यांनी स्पष्ट केले़ मी सर्व ७० जागा लढवू इच्छितो़ मला निवडणूक प्रचारावर लक्ष द्यायचे आहे़ निवडणूक लढण्याचा निर्णय त्यामुळेच मी ऐनवेळी मागे घेतला, असे ते म्हणाले़