शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डॉनच्या मुलीच्या रिसेप्शनवर पोलिसांची नजर

By admin | Updated: September 25, 2014 10:56 IST

अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यावर मुंबई पोलिसांची करडी नजर आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यावर मुंबई पोलिसांची करडी नजर आहे. या रिसेप्शन सोहळ्यासाठी बॉलीवूडमधील काही जणांना निमंत्रण देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे असून दुबई व अरब देशांमध्ये दौ-यावर जाणा-या सेलिब्रीटींवर पोलिसांची नजर असणार आहे. 
छोटा शकीलच्या मुलीचे १९ सप्टेंबर रोजी पाकिस्तानमध्ये लग्न झाले आहे. शकीलची मुलगी व्यवसायाने डॉक्टर असून तिचा पतीही डॉक्टरच आहे. छोटा शकीलचा जावई मुळचा भारतीय असला तरी सध्या तो लंडनमध्ये राहतो. मुलीच्या लग्नानिमित्त छोटा शकीलने दुबईमध्ये रिसेप्शन सोहळा ठेवला आहे. याविषयी अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. हा सोहळा अरब देशांमधील कुठल्याही शहरात होऊ शकतो असे सूत्रांचे म्हणणे आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई पोलिस या रिसेप्शन सोहळ्याकडे गांभीर्याने बघत आहेत. या सोहळ्यासाठी बॉलीवूडमधील काही मंडळींना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे या मंडळींच्या दुबई व अरब देशांमधील दौ-यावर पोलिस नजर ठेवणार आहेत. बॉलीवूडमधील सेलिब्रीटी भारतातून थेट छोटा शकीलने आयोजित केलेल्या रिसेप्शन सोहळ्याला जाणार नाहीत. मात्र ते अन्य देशांमधून छोटा शकीलच्या रिसेप्शन सोहळ्याला उपस्थित राहू शकतील अशी शक्यता एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने वर्तवली आहे. मात्र छोटा शकीलने नेमके कोणाकोणाला निमंत्रित केले आहे याचा तपशील जाहीर करण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. 
 
डॉनची मुलं हुशार
छोटा शकील, छोटा राजन यांनी अंडरवर्ल्डमध्ये दहशतीच्या जोरावर नाव कमावले असले तरी त्यांची मुलं मात्र अंडरवर्ल्डपासून चार हात लांब असल्याचे दिसून येते. नुकतीच विवाहबद्ध झालेली छोटा शकीलची मुलगी डॉक्टर आहे. तर छोटा राजनची मुलगीही सध्या परदेशात उच्च शिक्षण घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.