नाशिक : मोबाइलवर बोलू न दिल्याचा राग आल्याने सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सावंत यांना मारहाण करणार्या टिप्पर गँगमधील संशयितांच्या व त्यांच्या नातेवाइकांच्या पोलीस कोठडीत न्यायाधीश श्रीमती एस़ एऩ भालेराव यांनी तीन दिवसांची वाढ केली आहे़ पोलीस कोठडीची मुदत संपल्याने या संशयितांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते़मोक्कातील आरोपी व सिडकोतील कुप्रसिद्ध टिप्पर गँगला न्यायालयीन कामासाठी बुधवारी (दि़ ७) जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते़ या गँगचा सुनील अनर्थे हा मोबाइलवर बोलत असताना त्यास हटकले असता टिप्पर गँगचा म्होरक्या समीर पठाण, सुनील अनर्थे, नागेश सोनवणे, नितीन काळे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सावंत यांना न्यायालय आवारात मारहाण करून त्यांचे रिव्हॉल्व्हर हिसकावण्याचा प्रयत्न केला़ यामध्ये गुन्हेगारांचे नातेवाईक रईसा नासीर पठाण, हीना नासीर पठाण, भागवत रघुनाथ सोनवणे, अलका भागवत सोनवणे, बाळकृष्ण केशव काळे, आशा बाळकृष्ण काळे यांचाही सहभाग होता़या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन सावंत यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फि र्यादीनुसार टिप्पर गँगमधील चार व त्यांच्या सहा नातेवाइकांवर पोलीस उपनिरीक्षकास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता़ यातील सहा संशयितांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज न्यायालयात हजर केले असता त्यामध्ये तीन दिवसांची वाढ करण्यात आली असून, १४ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
पोलीस उपनिरीक्षक हल्ल्यातील संशयितांच्या कोठडीत वाढ
By admin | Updated: May 11, 2014 23:11 IST