शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवालांच्या घरी शिरले पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 03:03 IST

दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांच्यावर आम आदमी पार्टीच्या आमदारांनी केलेल्या हल्ल्यानंतर शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराची झाडाझडती घेतली.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांच्यावर आम आदमी पार्टीच्या आमदारांनी केलेल्या हल्ल्यानंतर शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराची झाडाझडती घेतली. घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी ते तेथे गेले होते.संतप्त केजरीवाल यांनी त्यानंतर सवाल केला आहे की, मोठ्या संख्येने पोलीस माझ्या घरी पाठविण्यात आले. घराची झडती सुरू आहे. या चौकशीला काहीच हरकत नाही. पोलिसांनी बारकाईने तपास करावा. पण न्यायाधीश लोया यांच्या मृत्यू प्रकरणात अमित शहा यांची चौकशी कधी होणार आहे? दिल्ली सरकारचे प्रवक्ते अरुणोदय प्रकाश यांनी सांगितले की, जवळपास ६० ते ७०पोलीस कर्मचाºयांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी प्रवेश केला. हे निवासस्थानच त्यांनी ताब्यातघेतले. कोणतीही सूचना नदेता हे पोलीस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसले. पोलीसराजने दिल्लीच्या लोकशाहीची हत्या केली आहे. ते मुख्यमंत्र्यांशी असे वागत असतील तर, गरीब लोकांबाबत ते काय करू शकतात? केजरीवाल यांच्या निवासस्थानी बैठकीच्या वेळी मुख्य सचिवांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आपचे आ. प्रकाश जारवाल व अमानतुल्ला खान यांना अटक झाली आहे.चौकशीला काहीच हरकत नाही. पोलिसांनी बारकाईने तपास करावा. पण न्यायाधीश लोया यांच्या मृत्यू प्रकरणात अमित शहा यांची चौकशी कधी होणार आहे? - अरविंद केजरीवालमुख्यमंत्री केजरीवाल यांचे सल्लागार व्ही. के. जैन यांच्यावर जबाब बदण्यासाठी पोलीस दबाव आणत आहेत, असा आरोप आपने केला. आशुतोष व संजय सिंह यांनी दावा केला की, आप सरकार अस्थिर करण्याचे हे कारस्थान आहे. नायब राज्यपाल अनिल बैजल हे भाजपाचे एजंट असल्याची टीका त्यांनी केली. पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबात जैन यांनी त्या घटनेच्या वेळी शौचालयात होतो व नेमके काय झाले हे आपणास माहीत नाही, असे पोलिसांना सांगितले आहे. आशुतोष म्हणाले की, मुख्य सचिवांनी आपल्यावर रात्री १२ वाजता ह्ल्ला झाल्याचा आरोप केला आहे. मात्र ते ११.३0 वाजता मुख्यमंत्र्यांच्या घरातून जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत, असा दावा आशुतोष यांनी केला.सनदी अधिकारी पीएमओमध्येमुख्य सचिवांवरील हल्ल्यानंतर दिल्ली सरकारमधील सनदी अधिकाºयांचे शिष्टमंडळ शुक्रवारी पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांना भेटले आणि आपल्या तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जितेंद्र सिंह म्हणाले की, हे अधिकारी कार्मिक मंत्रालयासमोर आपल्या तक्रारी नोंदवू इच्छित होते. कार्मिक मंत्रालय हे भारतीय प्रशासकीय सेवेवर नियंत्रण ठेवते.

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल