शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
4
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
5
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
6
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
7
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
8
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
9
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
10
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
11
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
12
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
13
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
14
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
15
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
16
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
18
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
19
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
20
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची घरोघर चौकशी (सिंहस्थ पानासाठी)

By admin | Updated: July 12, 2015 23:56 IST

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणी कालावधीत येणार्‍या कोट्यवधी भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून एक विशेष मोहीम राबविली जाते आहे़ या काळातील संभाव्य दहशतवादी हल्ला, घातपात, बॉम्बस्फोट अशा प्रकारच्या घटनांची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे अशा प्रकारचे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जाते आहे़ सुरक्षेच्या कारणास्तव कोअर ठिकाणची अर्थात पंचवटी, सरकारवाडा, आडगाव परिसरातील नागरिकांची पोलिसांकडून घरोघर जाऊन चौकशी केली जाते आहे़

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणी कालावधीत येणार्‍या कोट्यवधी भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून एक विशेष मोहीम राबविली जाते आहे़ या काळातील संभाव्य दहशतवादी हल्ला, घातपात, बॉम्बस्फोट अशा प्रकारच्या घटनांची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे अशा प्रकारचे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जाते आहे़ सुरक्षेच्या कारणास्तव कोअर ठिकाणची अर्थात पंचवटी, सरकारवाडा, आडगाव परिसरातील नागरिकांची पोलिसांकडून घरोघर जाऊन चौकशी केली जाते आहे़
पर्वणीकाळात नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणचे मिळून सुमारे दीड कोटी भाविक येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे़ त्यात या दोन्ही ठिकाणच्या शाही पर्वणीच्या तारखा एकाच दिवशी असल्याने पोलिसांपुढे भाविकांच्या सुरक्षेचे आव्हान आहे़ याबरोबरच भाविकांच्या या लोंढ्यामध्ये येणार्‍या प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्याचे नियोजनही पोलिसांकडून सुरू आहे़ मात्र तत्पूर्वी ज्या ठिकाणाहून शाही मिरवणूक, शाहीस्नान होणार आहे अशा ठिकाणची तेथील नागरिकांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे़
पंचवटीतील रामकुंडावर साधू-महंत, तर नव्याने तयार करण्यात आलेल्या घाटांवर भाविकांना स्नानासाठी नेले जाणार आहे़ रामकुंड, शाही मिरवणूक मार्ग तसेच घाटांजवळील रहिवासी क्षेत्रातील नागरिकांची अर्थात कोअर एरियाची पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे़ गंगाघाटावरील वाड्यांची परिस्थिती तेथे राहणार्‍या नागरिकांची संख्या, त्यांच्याकडे पर्वणीकाळात येणारे नातेवाईक यांची चौकशी पोलिसांकडून केली जाते आहे़ याबरोबरच भाडेकरू असल्यास त्याचे ओळखपत्र तपासून बघितले जाते आहे़
सिंहस्थ पर्वणी काळात घातपातासाठी एखादा दहशतवादी येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे सुरक्षिततेसाठी पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे़ यामध्ये पोलिसांनी या परिसरातील प्रत्येक घराचा उंबरा पायी घालण्याचे काम केले आहे़ तसेच कोणी संशयित वा पाहुणा आलेल्या असल्यास त्याचीही चौकशी करून त्याचे कागदपत्र तपासले जात आहेत़ पोलिसांच्या या कारवाईमुळे काही नागरिकांना त्रास सहन करावा लागत असला तरी सुरक्षिततेसाठी केल्या जाणार्‍या या कामासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन यांच्याकडून केले जाते आहे़ (प्रतिनिधी)