शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची डोकेदुखी वाढली कत्तलखान्याचा प्रश्न : झेंडीगेटमध्ये तणाव

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

अहमदनगर : शहरामध्ये कत्तलखाना नसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. गायींची कत्तल होत असल्याच्या संशयावरून दर आठ ते पंधरा दिवसांनी शहरात तणाव निर्माण होत आहे. दोन समाजामध्ये वादावादीचे रुपांतर तणावात होत असल्याने पोलिसांनाही हातची कामे सोडून गायींमागे धावावे लागते आहे. महाशिवरात्रीच्या दिवशीच मंगळवारी झेंडीगेट परिसरात दहा ते पंधरा गायी कत्तल करण्यासाठी आणल्याचा संशय निर्माण झाल्याने कुरेशी समाज आणि हिंदु राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने वातावरण तापले होते.

अहमदनगर : शहरामध्ये कत्तलखाना नसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. गायींची कत्तल होत असल्याच्या संशयावरून दर आठ ते पंधरा दिवसांनी शहरात तणाव निर्माण होत आहे. दोन समाजामध्ये वादावादीचे रुपांतर तणावात होत असल्याने पोलिसांनाही हातची कामे सोडून गायींमागे धावावे लागते आहे. महाशिवरात्रीच्या दिवशीच मंगळवारी झेंडीगेट परिसरात दहा ते पंधरा गायी कत्तल करण्यासाठी आणल्याचा संशय निर्माण झाल्याने कुरेशी समाज आणि हिंदु राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने वातावरण तापले होते.
मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास जामखेड रोडमार्गे दहा ते पंधरा गायी असलेला एक टेम्पो झेंडीगेट भागातील नगर तालुका पोलीस ठाण्याच्या परिसरात घुसला. या टेम्पोतील गायी कत्तल करण्यासाठी आणल्याची माहिती हिंदु राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यामुळे शंभरावर कार्यकर्ते झेंडीगेटमध्ये आले. तेथून त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात मोर्चा वळविला. गायी सोडविण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी कोतवाली पोलिसांनी दहा ते पंधरा पोलिसांची कुमक झेंडीगेटकडे पाठविली. कार्यकर्ते आणि कुरेशी समाजातील खाटीक यांच्यात पोलिसांनी समेट घडवून आणल्याने वाद निवळला.
नगर तालुका पोलिस ठाणे हे कुरेशी गल्लीमध्येच असले तरी या ठाण्यात पोलसांची कुमक कमी असल्याने त्यांनी कोतवाली पोलिसांना माहिती देऊन पोलीसबळ पाठविण्याची मागणी केली. हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी मात्र गायी सोडविण्यासाठी पोलिसांकडे आग्रह धरला. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक भारत जाधव घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी चौकशी करून कारवाईबाबत वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-------------------
महापालिका उदासीन
शहराच्या बाहेर कत्तलखान्याची जागा शोधणे, अत्याधुनिक जागेवर बांधकाम करणे आणि शहराच्या काही भागात सुरू असलेले कत्तलखाने बंद करण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. महापालिका प्रशासन मात्र याबाबत काहीच हालचाली करीत नसल्याने शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहराच्या बाहेर कत्तलखाना निर्मिती करण्याचा विषय दरवर्षीच्या अर्थसंकल्पात घेतला जातो. मात्र प्रत्यक्षात त्यासाठी कार्यवाही केली जात नसल्याने अनेक वर्षांपासून कत्तलखान्याचा विषय रखडलेला आहे.
-------------
वडगाव गुप्ता येथे जागा
शहराबाहेरील वडगाव गुप्ता भागात महापालिकेचा जुना कोंडवाडा असलेल्या जागेत कत्तलखाना करण्याबाबतचा विषय स्थायी समितीमध्ये अनेकवेळा चर्चेला आला होता. मात्र त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. तसेच शहरातील अनधिकृत कत्तलखाना चालविणार्‍यांवर महापालिकेकडून कारवाई होत नसल्याने शहरात तेढ निर्माण झाली आहे.