शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्याविरोधात पोलिसांनी दाखल केला गुन्हा; प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 18:33 IST

Delhi Elections 2025: भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या विरोधात निवडणूक अधिकाऱ्यांने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

Delhi Election BJP Candidate: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक अधिकाऱ्याने प्रवेश वर्मा यांच्याविरोधात मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र दिले होते. त्याआधारे एफआरआय नोंदवण्यात आला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रवेश वर्मा यांच्याकडून आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचे पत्रात म्हटलेलं आहे. 

प्रवेश वर्मा यांच्यावर आरोप काय?

भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी वाल्मिकी मंदिर परिसरात मतदारांना मोफत बूट वाटले. हा प्रकार समोर आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी ओ.पी. पांडे यांनी रजनीश भास्कर यांच्याकडील व्हॉट्सअप मेसेज आधारे ही तक्रार दिली होती. वर्मा यांनी महिला मतदारांना बूट वाटल्याचे व्हिडीओतही कैद झाले आहे. 

अरविंद केजरीवालांविरोधात लढत आहेत निवडणूक

भाजपचे प्रवेश वर्मा हे आपचे समन्वय आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. 

बुधवारी (१५ जानेवारी) प्रवेश वर्मा यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. त्यापूर्वी त्यांनी वाल्मिकी मंदिरात जाऊन त्रिशुल आणि गदा उचलली आणि देवाच्या पाया पडले. त्यानंतर त्यांनी महिलांना स्वतःच्या हाताने बूट घातले. यावर आम आदमी पक्षाच्या नेत्यानी मतदारांना आमिष दिल्याचा आरोप केला. 

WhatsApp वरून तक्रार

निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने पत्रात म्हटले आहे की, 'वकील रजनीश भास्कर यांनी व्हॉट्सअपवरून तक्रार दिली आहे. प्रवेश वर्मा यांनी वाल्मिकी मंदिराच्या परिसरात नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील मतदारांना बुटाचे वाटप केले आहे. तक्रारदाराने दोन व्हिडीओही पाठवले  आहेत. ज्यात प्रवेश वर्मा महिलांना बुटाचे वाटप करताना दिसत आहेत.' 'लोकप्रतिनिधी कायदा १९५१ मधील कलम १२३ (१)(अ) नुसार कोणत्याही उमेदवाराने वा त्याच्या प्रतिनिधीने किंवा उमेदवार वा त्यांच्या एजंटच्या संमतीने कुठल्याही व्यक्तीने कोणत्याही प्रकारची भेटवस्तू, प्रस्ताव वा हमी देणे भ्रष्ट वर्तणूकीच्या अंतर्गत येते. त्यामुळे या प्रकरणाची तत्काळ कारवाई करून योग्य कारवाई करण्यात यावी', असे पत्रात म्हटलेले आहे.