पोलिसांनी शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली होती , अर्शी खानचा आरोप

By admin | Published: October 27, 2016 10:19 PM2016-10-27T22:19:06+5:302016-10-27T22:19:06+5:30

पुणे पोलिसांनी मॉडेल अर्शी खानला देहविक्रयच्या आरोपाखाली अटक केली होती, त्यानंतर ती पसार झाली. यावेळी पोलिसांनी शारिरिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती असा गंभीर आरोप

Police had demanded to have sex, and Arshi Khan's allegation | पोलिसांनी शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली होती , अर्शी खानचा आरोप

पोलिसांनी शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली होती , अर्शी खानचा आरोप

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 27 - पुण्यात तीन दिवसांपूर्वी टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी मॉडेल अर्शी खानला देहविक्रयच्या आरोपाखाली अटक केली होती, त्यानंतर ती पसार झाली.  यावेळी पोलिसांनी शारिरिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती असा गंभीर आरोप तिच्याकडून करण्यात आला आहे. 
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अर्शी अरोरा टॉवरमध्ये मित्रांना भेटायला आली होती. स्वतःच्या नावाने तिने रूम बूक केली होती. अर्शी खानची मैत्रीण आणि  पब्लिक रिलेशन्सचं काम सांभाळणारी  फ्ल्यंन रेमेडिओसनुसार,  ज्या पोलिसांनी अरोरा टॉवरमध्ये छापा टाकला होता त्यांनी अर्शीकडे 15 लाख रूपयांची मागणी केली होती, अर्शीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनी तिच्याशी शारिरिक संबंध टेवण्याची मागणी केली असं ती म्हणाली. अर्शीने त्यांची कोणतीच मागणी मानण्यास नकार दिल्यावर तिला महिला सुधारगृहात पाठवण्यात आलं. सुधारगृहात गेल्यावर तिला अपशब्द वापरण्यात आले आणि गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप तिच्या मैत्रीणीने केला. 
तेथील कर्मचा-यांनी अर्शीकडून पैसे आणि मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी एक महिला पोलीस तेथे पोहोचली आणि अर्शीला तेथून जाण्यास सांगण्यात आले. दुसरीकडे, पुणे पोलिसांनी सर्व आरोप चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. कृष्णा नावाचा दलाल काही मुलींकडून शरीरविक्री करवत असल्याची माहिती मिळाल्यानंतरच छापा टाकण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.  तसेच अर्शीविरोधात भक्कम पुरावे असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
 

Web Title: Police had demanded to have sex, and Arshi Khan's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.