शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दारू माफियांविरोधात कारवाई करणा-या पोलिसांची गाडीच कंटेनरनं उडवली, 5 पोलिसांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 13:24 IST

बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात पोलीस कर्मचा-यांच्या गाडीवर कंटेनर चालवण्यात आल्याने 5 पोलिसांचा जागीच मृत्यू झाला आहे. याशिवाय दोन पोलीस अधिका-यसहीत एकूण 4 जण गंभीर जखमी झालेत.

मुझफ्फरपूर, दि. 11 - बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात पोलीस कर्मचा-यांच्या गाडीवर भरधाव कंटेनर चालवण्यात आल्याने 5 पोलिसांचा जागीच मृत्यू झाला आहे. याशिवाय दोन पोलीस अधिका-यांसहीत एकूण 4 जण गंभीर जखमी झालेत. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या वेळी ही घटना घडली त्यावेळी पोलिसांचं पथक अवैध दारूमाफियांविरोधात कारवाई करण्याच्या तयारीत होते. यावेळी भरधाव येणा-या कंटेनरनं या पोलिसांच्या गाडीला उडवले. ही धक्कादायक घटना रविवारी उशीरा रात्री घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

घटनेत जखमी झालेले डीएम धर्मेंद्र सिंह आणि एसएसपी विवेक कुमार बैरिया यांनी जवळील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिचरा परिसरातून मोठ्या प्रमाणात दारू जप्त करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान अटक करण्यात आलेल्या चालकानं पोलिसांनी माहिती दिली की, दारूमाफिया अकुराहां ढाला याच परिसरातून प्रवास करणार आहे. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस उप-अधीक्षक कृष्ण मुरारी प्रसाद यांच्या नेतृत्वात पोलीस प्रत्येक वाहनांची तपासणी करत होते. यादरम्यान, समोरुन एक कंटेनर भरधाव येत असल्याचे दिसले. पोलिसांनी कंटेनर चालकाला थांबण्याचा इशारा केला. तर कंटेनर थांबवण्याऐवजी गती वाढवून चालकानं भरधाव कंटेनरनं पोलिसांची गाडीच उडवली.  मृतांमध्ये एक हवालदार, तीन शिपाई आणि पोलिसांच्या गाडीचालकाचा समावेश आहे. विश्व मोहन शर्मा, विजय चौधरी, मुन्ना चौधरी, फरमान अंसारी अशी मृतांची नावं आहेत. 

बिहारमध्ये दारूबंदीदरम्यान, 2016 मध्ये 1 एप्रिलपासून बिहारमध्ये दारूबंदी लागू करण्यात आली आहे. देशी बनावटीच्या परदेशी दारूसह सर्व प्रकारच्या दारू विक्रीवर येथे बंद घालण्यात आली आहे. सरकारने 1 एप्रिलला ग्रामीण भागात देशी व इतर दारूवर बंदी घातली होती. यावेळी गावं व शहरात परदेशी दारूच्या विक्रीला परवानगी कायम ठेवली होती. परंतु दारूबंदी निर्णयाला राज्यातील जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने दारूवर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.