शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

भिकाऱ्याला भीक देणे भोवले, पोलिसांनी दाखल केला एफआयआर; देशातील पहिलीच घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 21:04 IST

प्रशासनाचे भिकारीमुक्त शहर बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी भिकाऱ्यांचे पुनर्वसन केले जात आहे.

MP News :मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात भिकाऱ्यांना भीक देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. प्रशासनाने इंदूरला देशातील पहिले 'भिक्षामुक्त शहर' बनविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळेच भीक मागण्यास व देण्यास बंदी घातली असून, असे करणाऱ्यावर कारवाई केली जात आहे. सोमवारी लासुडिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने मंदिराबाहेर एका भिकाऱ्याला 10 रुपये दिले. यानंतर प्रशासनाच्या भिकारी निर्मूलन पथकाने तक्रार नोंदवून आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला.

भिकाऱ्याला पैसे दिल्याबद्दल कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची 15 दिवसांतील ही दुसरी घटना आहे. इंदूर पोलिसांनी सांगितले की, भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम 223 अंतर्गत या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सरकारने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी 23 जानेवारी रोजी खांडवा रोडवरील एका मंदिराजवळ भिकाऱ्याला भिक्षा दिल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला होता.

नियमांचे उल्लंघन केल्यास 5,000 रुपयांपर्यंत दंडइंदूर प्रशासनाने भीक मागणे, भिकाऱ्यांकडून वस्तू देणे आणि खरेदी करण्यावर कायदेशीर बंदी घातली आहे. जर कोणी या नियमांचे उल्लंघन केले, तर त्याला एक वर्षांपर्यंत कारावास, 5,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. दरम्यान, भिकाऱ्यांचे पुनर्वसन करण्याचे कामही प्रशासनाने केले आहे. इंदूर जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे की, गेल्या सहा महिन्यांत शहरातील 600 हून अधिक भिकाऱ्यांना पुनर्वसनासाठी निवारागृहात पाठवण्यात आले आहे. यापैकी सुमारे 100 मुलांना बालसंगोपन संस्थांमध्ये पाठवण्यात आले आहे. 

माहिती दिल्यास 1000 रुपयांचे बक्षीसभोपाळमध्येही भिकाऱ्यांना पैसे देण्यावर कडक कारवाई केली जात आहे. या मोहिमेंतर्गत भिकाऱ्यांना पैसे देण्याऐवजी प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. भिकारी निर्मूलन पथकाने माहिती देणाऱ्यास 1000 रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. इंदूर प्रशासनाचे उद्दिष्ट भिकाऱ्यांना पूर्णपणे संपवून भिकारीमुक्त शहर बनवण्याचे आहे. त्या दिशेने अनेक पावले उचलली जात असून मोहीम अधिक तीव्र करण्यात येत आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी