शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Kisan Kranti Padyatra: पोलिसांनी केलेल्या कारवाईचं राजनाथ सिंहांकडून समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 13:52 IST

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींबरोबरच हमीभाव, कर्जमाफी यांसारख्या विविध मागण्यांसाठी शेतक-यांचा मोठा ताफा आज दिल्लीत धडकला.

नवी दिल्ली- स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींबरोबरच हमीभाव, कर्जमाफी यांसारख्या विविध मागण्यांसाठी शेतक-यांचा मोठा ताफा आज दिल्लीत धडकला. शेतक-यांच्या या मोर्च्यादरम्यान आंदोलन आणि  पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली. तसेच शेतक-यांनीही पोलिसांवर दगडफेक केली आहे, त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.पोलिसांनी आक्रमकपणे कारवाई करत शेतक-यांच्या मोर्चावर पाण्याचा फवारा मारला. पोलिसांच्या आक्रमक कारवाईत अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. त्यातच पोलिसांनी केलेल्या आक्रमक कारवाईचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी समर्थन केलं आहे. पोलिसांनी आक्रमक कारवाई केलेली नाही. पोलिसांनी आपल्या बचावासाठी कारवाई केली आहे. शेतक-यांच्या प्रश्नावर चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे राजनाथ सिंह म्हणाले आहेत. पोलिसांनी एकंदरित शेतक-यांवर केलेल्या कारवाईचं केंद्रीय गृहमंत्र्यांनी समर्थन केलं आहे. त्यामुळे सरकारवर सर्वच स्तरांतून टीका होत आहे.शेतक-यांनी 23 सप्टेंबरपासून हरिद्वारमधून पदयात्रेला सुरुवात केली होती. त्यानंतर शेतकरी उत्तर प्रदेशमध्ये दाखल झाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत सोमवारी 1 ऑक्टोबर रोजी झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतक-यांनी मोर्चा दिल्लीकडे वळवला. भारतीय किसान युनियनने ‘किसान क्रांती यात्रा’ या मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात 50 हजारांहून अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत. 2 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील राजघाट येथे या यात्रेचा समारोप होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह