शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

सोनभद्रमधील पीडितांना भेटू इच्छिणाऱ्या प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 06:40 IST

उत्तर प्रदेशमधील सोनभद्रमध्ये जमिनीच्या वादातून घडलेल्या हिंसाचारात १० जण ठार झाले होते.

लखनौ : उत्तर प्रदेशमधील सोनभद्रमध्ये जमिनीच्या वादातून घडलेल्या हिंसाचारात १० जण ठार झाले होते. तेथील पीडितांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पोलिसांनी शुक्रवारी नारायणपूर येथे रोखून पुढे जाण्यास मनाई केली. तरीही आपला निर्धार कायम राखलेल्या प्रियांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईच्या निषेधार्थ प्रियांका यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावरच ठाण मांडून धरणे धरले होते.सोनभद्रमधील हिंसाचारावरून उत्तर प्रदेशचे राजकारण तापले आहे. या प्रकरणी खूप गहजब झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी व अन्य चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत, तसेच सरपंच यज्ञ दत्त, त्याचा भाऊ व अन्य २९ जणांना अटक करण्यात आली आहे.सोनभद्रमधील हिंसाचारात जखमी झालेल्यांची वाराणसी येथील बीएचयू ट्रॉमा सेंटर रुग्णालयात जाऊन प्रियांका गांधींनी विचारपूस केली. त्यानंतर, त्या सोनभद्रला जायला निघाल्या असताना त्यांना वाटेत पोलिसांनी अडवून चुनार येथील गेस्ट हाउसला घेऊन गेले. मात्र, या गेस्ट हाउसची वीज कापण्यात आली. त्यानंतर, पाणीही बंद करण्यात आले. काही काळ उकाड्यातच तेथे काढल्यावर प्रियांका गांधी यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यातच ठाण मांडून धरणे धरले व पोलीस व योगी सरकारचा निषेध केला. प्रियांका गांधी म्हणाल्या की, सोनभद्रला माझ्या मुलाच्या वयाच्या एकाला गोळ्या घालून जखमी  करण्यात आले. आता तो रुग्णालयात उपचार घेत आहे. तिथे गोळ््या घालून ठार मारण्यात आलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मला भेटायचे होते. त्यांना भेटण्यापासून मला कोणत्या कायद्याच्या आधारे रोखण्यात आले असा संतप्त सवालही प्रियांका गांधी यांनी विचारला. चुनार गेस्ट हाऊस येथून प्रियांका गांधी नंतर दिल्लीला परत गेल्या.असुरक्षिततेच्या भावनेतून केली कारवाई : राहुल गांधीउत्तर प्रदेश सरकारने प्रियांका गांधी यांना बेकायदेशीररित्या अटक केली असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. असुरक्षिततेच्या भावनेतून योगी आदित्यनाथ सरकारने आपल्या हाती असलेल्या अधिकारांचा मनमानी वापर केल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधी