शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
2
फ्रान्समध्ये अचानक वीज झाली 'मोफत', सरकारकडून नागरिकांना 'शून्य दरात' पुरवठा
3
पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस होणार?; CM म्हणाले, “बाप जिवंत असताना...”
4
इंडिगोचा मोठा निर्णय! त्रस्त प्रवाशांना नुकसानभरपाई; मिळणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर
5
"कृपया, माझे पैसे द्या...", तान्या मित्तलने ८०० साड्यांचं पेमेंट बुडवलं? स्टायलिस्टचा गंभीर आरोप
6
TATA च्या 'या' शेअरची बिकट स्थिती; ५०% पेक्षा जास्त घसरला, नव्या नीचांकी स्तरावर पोहोचला शेअर
7
पाकिस्तानी इतिहासात पहिल्यांदाच ISI प्रमुखाला शिक्षा! इम्रान खानशी संबंध भोवले, जनरल फैज हमीद १४ वर्षे तुरुंगवास
8
'अमित शाह घाबरले, त्यांचे हातही थरथरत होते...', राहुल गांधींचा गृहमंत्र्यांवर निशाणा
9
डेट फंड्सकडे गुंतवणूकदारांची पाठ! महिन्यात २५,६९२ कोटी काढले, 'या' योजनेला सर्वाधिक पसंती
10
करण जोहरची 'धुरंधर'वर प्रतिक्रिया, रणवीर सिंह अन् दिग्दर्शक आदित्य धरबद्दल म्हणाला...
11
Arunachal Pradesh Accident: अरुणाचल प्रदेशात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला, १७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
IPO पूर्वी झुनझुनवाला कुटुंबानं 'या' कंपनीत केली ₹१०० कोटींची गुंतवणूक, अन्य २५ दिग्गजांनीचीही इनव्हेस्टमेंट
13
नवीन कामगार कायद्यांमुळे हातात येणारा पगार खरंच कमी होणार?; कामगार मंत्रालयाचा महत्त्वाचा खुलासा, सगळं गणित समजावलं
14
रोहित शर्मा अन् विराट कोहलीच्या पगारात होणार मोठी घट; शुभमन गिलला मिळणार 'बंपर फायदा'?
15
पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावर १४०० कोटींचा भूसंपादन घोटाळा ! भाजपा- शिंदे सेनेच्या नेत्यांवर सुषमा अंधारेंच्या आरोपांनी खळबळ
16
सोशल मीडियावरचे आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले; म्हणाले, इथेनॉल मिश्रित इंधनावर ARAI ने १ लाख किमी...
17
Western Overseas Study Abroad IPO: पहिल्याच दिवशी IPO नं दिला झटका, आपटून ५२ रुपयांवर आला; लागलं लोअर सर्किट
18
Travel : दुबई स्वप्ननगरी! किती खर्चात होईल ५ दिवसांची शाही सफर; वाचा संपूर्ण बजेट आणि जाणून घ्या व्हिसाबद्दल..
19
Relationship Tips: बायकोला खुश कसे ठेवावे? प्रेमानंद महाराज म्हणाले, 'मी यात तज्ज्ञ नाही पण...'
20
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! BoAt कंपनीच्या कारभारात गंभीर त्रुटी, नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड
Daily Top 2Weekly Top 5

महामेळावा दडपण्याचा कर्नाटक प्रशासनाचा प्रयत्न, बेळगावात मराठी भाषिकांची 'धरपकड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 12:09 IST

''कर्नाटक''च्या बसवर ''जय महाराष्ट्र!, ''गडहिंग्लज''ला उद्धवसेनेचे आंदोलन

बेळगाव : कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी साेमवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित मराठी भाषिक महामेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. दडपशाही केली. तरी यास न जुमानता मराठी भाषिकांनी आपली अस्मिता दाखवीत पुन्हा एकदा लेले मैदान परिसरात एकत्रित येत कानडी दांडेलीचा निषेध केला.पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही म. ए. समितीने लोकशाही हक्काचा आधार घेत मेळावा आयोजित करण्याचा निर्धार केल्यामुळे बेळगाव शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मेळावा होऊ नये यासाठी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करून कर्नाटक सरकारने पोलिसांना हाताशी धरून आयोजनात अडथळा आणण्यास सुरुवात केली.व्हॅक्सिन डेपो परिसरासह अनेक संवेदनशील रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून मोठा पोलिस बंदाेबस्त ठेवला होता. व्हॅक्सिन डेपो मैदानाकडे जाणाऱ्या टिळकवाडीतील आगरकर रोड, रानडे रोड, रॉय रोड, तसेच दुसऱ्या रेल्वे गेटकडून जाणारा रस्ता, आदी सर्व रस्ते बंद केले होते. व्हॅक्सिन डेपो मैदानाला साेमवारी पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.या पार्श्वभूमीवर, हिवाळी अधिवेशनविरोधी महामेळाव्याच्या आयोजनात अडथळा आणण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी पहाटेपासूनच धरपकड सुरू केली. पूर्व खबरदारी म्हणून वॅक्सिन डेपो मैदानाकडे जमा होण्यासाठी येणाऱ्या सर्वच समिती नेत्यांना ताब्यात घेऊन एपीएमसी पोलिस ठाण्यात स्थानबद्ध केले.सुरुवातीला म. ए. समितीचे नेते शुभम शेळके, धनंजय पाटील, मनोहर उंदरे यांच्यासह अनेकांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या दडपशाहीला न जुमानता व्हॅक्सिन डेपो मैदानाकडे कूच केली. यावेळी पोलिसांनी त्यांना मैदानात प्रवेश करण्यापासून रोखले असता दोन्ही बाजूंमध्ये मोठी शाब्दिक चकमक उडाली.कार्यकर्त्यांनी ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे" अशा जोरदार घोषणा दिल्या. पोलिसांनी माजी आमदार मनोहर किनेकर, रमाकांत कोंडुस्कर, आर. एम. चौगुले, समिती खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, रामचंद्र मोदगेकर, प्रेमा मोरे, रणजित चव्हाण पाटील, संजय शिंदे, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि एपीएमसी पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करून काही वेळाने सुटका केली.यासंदर्भात शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी माध्यमांशी बोलताना, ८ डिसेंबरच्या महामेळाव्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने परवानगी मागितली होती. तथापि, काही भिन्न आणि प्रशासकीय कारणांमुळे ती मागणी फेटाळली असून, तसे लेखी स्वरूपात आयोजकांना कळविले आहे. नियमांचे उल्लंघन करून मेळावा घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.लोकशाहीच्या मार्गातून आमचा आंदोलन करण्याचा प्रयत्न सुरूच आहे. हिवाळी अधिवेशनाला पहिल्या अधिवेशनापासून आम्ही विरोध करीत आलो आहाेत. महाराष्ट्रातील सर्व पक्षीयांनी दिल्ली दरबारी आवाज उठवून मराठी भाषिकांवर होणारा अन्याय कमी करण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केले.''कर्नाटक''च्या बसवर ''जय महाराष्ट्र!, ''गडहिंग्लज''ला उद्धवसेनेचे आंदोलनगडहिंग्लज : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांसह सीमा भागातील मराठी बांधवांवरील दडपशाहीचा उद्धवसेनेच्या येथील सैनिकांनी निषेध नोंदवला. बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी घोषणाबाजीही केली.बेळगाव येथील अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित मेळाव्याच्या विरोधातील कर्नाटक सरकारच्या दडपशाहीच्या निषेधार्थ हे आंदोलन केले. कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.सायंकाळी येथील आगारात आलेल्या कर्नाटक आगाराच्या बसवर ''जय महाराष्ट्र'' लिहून भगवे झेंडे लावण्यात आले. तसेच बसवरील कानडी भाषेतील मजकूर काळ्या शाईने खोडण्यात आला. या अनोख्या आंदोलनाची सीमाभागात विशेष चर्चा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Karnataka Attempts to Suppress Marathi Gathering; Arrests in Belgaum

Web Summary : Karnataka police denied permission for a Marathi convention in Belgaum, leading to arrests. Despite the crackdown, Marathi speakers protested, demanding inclusion in Maharashtra. Protests also erupted in Gadhinglaj against Karnataka's actions, with activists defacing Karnataka buses.