शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

लष्कर-ए-तैयबाच्या नेटवर्कचा पर्दाफाश, 5 दहशतवाद्यांना अटक; हिजबुल कमांडर ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 09:01 IST

दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा यासह घातक साहित्य जप्त करण्यात आले आहे.

श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाना मोठे यश मिळाले आहे. पुलवामा पोलिसांनी, दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील अनेक ग्रेनेड हल्ल्यांशी संबंधित प्रकरणांचा तपास करत असताना दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या सक्रिय सहकार्यांचे नेटवर्क उघड केले. पोलिसांनी तपासादरम्यान पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. शौकत इस्लाम दार, एजाज अहमद लोन, एजाज गुलजार लोन, मंजूर अहमद भट आणि नसीर अहमद शाह अशी त्यांची नावे आहेत.

प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, हे मॉड्यूल स्लीपर सेल म्हणून काम करत होते आणि शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा खरेदी तसेच वाहतुकीमध्ये गुंतले होते. त्यांच्या पाकिस्तानी आकाच्या सांगण्यावरुन सुरक्षा दलांवर झालेल्या अनेक ग्रेनेड हल्ल्यांमध्येही त्यांचा सहभाग होता. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा यासह घातक साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी काकापोरा पोलिस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुलगाममध्ये हिजबुल कमांडर ठार

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा नवनियुक्त जिल्हा कमांडर शनिवारी ठार झाला. दक्षिण काश्मीरच्या अश्मुजी भागात दहशतवादी असल्याच्या गुप्त माहितीवरून सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली, असे पोलिस प्रवक्त्याने सांगितले.

दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला

ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची भरपूर संधी देण्यात आली होती, त्याऐवजी त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. सुरक्षा दलानेही प्रत्युत्तर दिले. यात हिजबुल मुजाहिद्दीनचा नवनियुक्त जिल्हा कमांडर मुदासीर वाजे चकमकीत मारला गेला. तो कुलगाममधील मालवानचा रहिवासी होता. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी